नेरळमधे सभासदांचा बोगस सह्या करुन केली ग्रुह निर्माण सोसायटीची नोंदणी!

सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हा नोंद होणार!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील नेरळ राजेंद्र गुरु नगर येथिल साई तुलसी सोसायटीत प्रंचड अनागोंदी सुरू आहे, या सोसायटी मधील जास्मिन सोसायटीचे अध्यक्ष दिपक देशमुख व सचिव संतोष मगर यांनी येथिल रहीवाश्यांची अक्षम्य फसवणुक केली आहे, येथील काही फ्लॅटधारकांचा बोगस सह्या मारुन येथे सोसायटी नोंदणी करणेचा पराक्रम येथिल अध्यक्षाने केला असुन सोसायटी नोंदणी निंबधकांचीही फसवणुक करण्यात आली आहे, त्यामुळे या सोसायटी नोंदणीची चौकशी करणेची मागणी येथिल काही फ्लॅटधारकांकडुन करण्यात आली आहे. 

या बाबत अधिक माहीती अशी की, कर्जत तालुक्यांतील नेरळ येथेल कर्जत-डोणे रस्त्या लगत असणाऱ्या साई तुलसी सोसायटीतील जास्मिन को- ॲाप-हाऊसिंग सोसायटी नोंदणी करणेत आली आहे, मात्र ॲप्लिकेशन फॅार रजिस्ट्रेशन ॲाफ सोसायटी फॅार्मवर या सोसायटीचे चीफ प्रोमोटर म्हणुन सही केलेल्या दिपक देशमुख यांनी या फॅार्मवर काही सभासदांचा नकली सह्या केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. तसेच काही सभासदांना तर ही सोसायटी नोंदणी केल्याची साधी कल्पना सुद्धा नसल्याचे काही सभासदांकडुन सांगणेत येत आहे. 

विशेष म्हणजे या सोसायटीचे अध्यक्ष दिपक देशमुख आणि सचिव संतोष मगर यांनी जास्मिन को-ॲाप-हाऊसिंग सोसायटी नोंदणी करताना या नोंदणी अर्जावर काहींचा खोट्या सह्याचे अर्ज सादर करुन सदर सोसायटी नोंदणी सहाय्यक निंबधक कर्जत यांची फसवणुक केल्याचेही बोलले जात आहे, तर दुसरीकडे कर्जतचे नोंदणी सहाय्यक निंबधक सोसायटीची पडताळून करुन सोसायटी नोंदणी करतात की कसे? याबाबत उलटसुलट चर्चा सर्वत्र सुरु आहे. तसेच जास्मिन सहकारी ग्रुह निर्माण संस्था, मर्या. या सोसायटीची नोंदणी बोगस अर्जाचा व माहीतीचा आधारे करण्यात आली आहे, त्यामुळे कर्जत दुय्यम नोंदणी निंबधकाची येथिल जास्मिन सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी फसवणुक केल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, तरीही खोट्या कागदांचा आधारे जास्मिन सोसायटीची नोंदणी कशी झाली? याची चौकशी करणेची मागणी या सोसायटीमधील काही सदस्यांकडून आता करण्यात येत आहे, 

दरम्यान जास्मिन सहकारी ग्रुहनिर्माण संस्था, मर्या. सोसायटी च्या वतीने या सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी संबधित बिल्डरांकडुन कन्व्हेंस डिड दस्तही बनविले आहे, मात्र या कन्व्हेनंस डिड मध्येही एका मागासवर्गिय सदनिका धारकाची सदनिकाही हडपण्याचा अक्षम्य प्रयत्न या सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी केला आसल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे याची तक्रार संबधित सदनिका धारकाने नेरळ पोलिस ठाण्यात दाखल केली आसुन संबंधितांवर कठोर कारवाई करणेची मागणी संबधित सदनिका धारकाने नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्याकडे केली आहे, 

त्यामुळे या सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्या मनमानीची जोरदार चर्चा संपुर्ण नेरळ शहरात सर्वत्र सुरु आहे. तसेच कर्जतचे सहाय्यक नोंदणी निंबधकही बोगस कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केलेली ही सोसायटीची नोंदणी रद्द करतात की कसे? याकडे आता साऱ्यांचा नजरा लागुन राहिल्या आहेत, या बोगस सह्यांचा आधारे सोसायटी रजिस्टर करण्यात आलेल्या विरोधात काही सभासद सहायय्क निंबधक यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे सांगणेत आले आहे.

संबंधित पोस्ट