योगीराज श्री. गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमस्थानी योगशिबिराचे आयोजन !
- by Reporter
- Jun 29, 2022
- 627 views
खोपोली : विश्वगौरव विभूषित स्वामी गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमांत, श्री गगनगिरी योग प्रशिक्षण संस्था (डोंबिवली) यांच्या वतीने तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरहू योगशिबीर हे शुक्रवार दि. ८ जुलै ते रविवार दि. १० जुलै पर्यंत होणार असून या शिबिरात प्रवेश घेणाऱ्या साधकांसाठी आश्रमात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून साधकांना शिबिराचे आदल्या दिवशी गुरुवार दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत हजर राहणे आवश्यक आहे. सदरहू योगशिबीर गगनगिरी योग प्रशिक्षण संस्थेचे अनुभवी योगशिक्षकांचे मार्गदर्शनाखाली, आयोजित करण्यात आहे आहे.
सदरहू उपक्रमात भाग घेण्यासाठी श्री गगनगिरी योग प्रशिक्षण संस्थेचे सर्वश्री अरुण जोशी (७७३८००२१९८ व ९८२०५४१५९८ ) तसेच सुनील काकडे (९९८७२३७९५४) व महादेव महाडिक (९२२२१५१६१९) यांचेशी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.

रिपोर्टर