लपुन छपुन काय हल्ले करता, हिम्मत असेन तर राजीनामा देवुन निवडुन येवुन दाखवा;- मंत्री आदित्य ठाकरे!
- by Reporter
- Jun 27, 2022
- 389 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- लपुन छपुन काय हल्ले करता, हिम्मत असेन तर राजीनामा द्या, आणि निवडुन येवुन दाखवा, असे आव्हान पर्यावरण मंत्री, युवा सेना प्रमुख ना. आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना केले आहे, रायगडचा महाराजांच्या भुमीत तुम्ही गद्दारी करता, तुम्हाला लाज वाटत नाही का, विधानसभेची पायरी तुम्हाला चढू देणार नाही, असा ईशाराही ठाकरे यांनी बंडखोरांना दिला आहे, आज सायंकाळी ४ वाजता कर्जत रॅायल गार्डन सभाग्रुहात निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना युवा नेते आदित्य ठाकरे बोलत होते.
राज्यात शिवसेना पक्षात मोठी बंडखोरी झाली आहे, या बंडखोरीत रायगड जिल्ह्यीतील तीन आमदारांनी शिवेसनेशी बंडखोरी करीत “शिंदे गटात” सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणेसाठी आज सेनेचे युवा नेते तथा पर्यावरन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज कर्जत शहरात येवुन मेळावा घेतला आहे.
रायगड जिल्ह्यातील सेनेचे कर्जतचे आमदार महेद्र थोरवे, अलिबाचे आमदार महेद्र दळवी आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांनी सेनेशी बंडखोरी केली आहे, त्यामुळे कर्जतचे शिवेसनेचे आमदार महेद्र थोरवे यांनीही सेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत सेने विरोधात भुमिका घेतली आहे. तेयामुळे शिवसैनिकांना आधार देणेसाठी आज दस्तूर खुद्द आदित्य ठाकरे हे कर्जतमधे आले होते.
कर्जत तालुक्यांतील एका रात्रीत आयोजन केलेल्या या मेळाव्याचे प्रस्तावीत कर्जतचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी केले, यावेळी शिवसेना नावाची जमीन कसायला दिली होती, तिचा ७/१२ आता नावावर करायला निघाले का? असा सवाल प्रस्तावात कोळंबे यांनी व्यक्त केला, कोणी कुठेही गेला तरी कर्जतची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या मागेच असेन असा विश्वासही तालुकाप्रमुख यांनी व्यक्त केला आहे.
या वेळी या मेळाव्याला रायगडचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमूख मनोहरशेठ थोरवे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख उत्तम कोळंब, खालापुर तालुका प्रमुख संतोष विचारे, युवा तालुका अधिकारी अमर मिसाल, गटनेते नितीन सावंत, संघटक संतोष भोईर, शिवराम बदे, खालापुरचे सेना नेते भाई शिंदे, नवीन घाटवल, भरतभाई भगत, उल्हासराव भुर्के, सुदाम पवाळी, एकनाथ पिंगले, विजय पाटील, बाबू घारे, सुरेश कडव, बाळाजी विचारे, मोहन ओसवाल, महीला जिल्हा संघटक रेखाताई ठाकरे, कर्जतचा रेश्मा म्हात्रे, रेश्मा आंग्रे, सुरेश पाटील, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, माथेरानचा नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यासंह अनेक सेनेचे पदाधिकारी येथे उपस्थिती होते,
दरम्यान या मेळाव्यात सेनेचा पदाधिकाऱ्यांनी कर्जतचे आमदार महेद्र थोरवे यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महेंद्र थोरवे यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवण्याचा या मेळाव्यात शिवसैनिकांनी निर्धार केला आहे, त्यामुळे महेद्र थोरवे यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचे बोलले जाते.
रिपोर्टर