मातोश्री हे आमचे मंदिर आहे, तर ठाकरे कुटुंबिय आमचे दैवत आहे, बंडखोरी करणारे मात्र संपणार - बबनदादा पाटील!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- मातोश्रीवर बोट उगाराल, तर खबरदार, मातोश्री हे आमचे मंदिर आहे तर ठाकरे कुटुंबिय आमचे दैवत आहे, मातोश्री व आमच्या दैवतांचा विचारांची प्रतरणा कराल तर राजकारणात गाडले जाल, असा सज्जड ईशारा नुकताच शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी बंडखोरांना दिला आहे, बंडखोरी करणाऱ्या आमदारांना जिल्ह्यात माफी नाही, शिवसैनिक त्यांचा कडेलोट करेन असेही बबनदादा पाटील यांनी म्हटले आहे, नुकताच काल रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्षाचा वतीने सेनेशी बंडखोरी केलेल्यांचा विरोधात निषेध नोदंविणेत आला. त्या प्रसंगी बबनदादा पाटील बोलत होते, 

सध्या महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचीच चर्चा सर्वत्र सुरु असुन रायगडातही या बंडखोरीचे पडसाद उमटले आहेत, काल रायगड शिवसेनेचा वतीने पनवेल खारघर येथे रायगडमधील शिवसेनेचा तीनही आमदारांचे पुतले जाळण्यात आले असुन या तीनही आमदारांचा विरोधात प्रंचड घोषणाबाजी करण्यात आली आहे, दरम्यान शिवसेना पक्षांसोबत ज्यांनी बंडखोरी केली ते नेते जरी काही प्रमाणात तरले असले, तरीही मात्र या नेत्यांसोबत गेलेले राजकारणातुन संपले असल्याचा ईतिहास असल्याचे शिवसैनिक सांगत आहेत. 

राज्याची विधान परिषदेची निवडणुक पार पडल्यानंतर सेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारत भाजप प्रणित राज्यात ठाणं मांडले. त्यामुळे भाजपाने शिवसेनेचा एक गट फोडला असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुलात सुरु आहे, सेनेचे अनेक आमदारांनीही शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांचा गटात सहभाग घेतला आहे, त्यामधे रायगड जिल्ह्यातीलही भरत गोगावले, महेद्र थोरवे, महेद्र दळवी या तीन आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे रायगड शिवसेनेत प्रंचड असंतोष आहे, 

नुकताच रायगड जिल्हा शिवसेना पक्षाचा वतीने या तीनही आमदारांचा काल निषेध रायगड शिवसेना पक्षाचा वतीने करण्यात आला आहे, रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांचेसह रायगडचे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी या तीनही आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या तीनही आमदारांचा विरोधात येथे संतप्त शिवसैनिकांनी प्रंचड घोषणाबाज केली आहे, तर रायगड जिल्हा सेनेचे संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी तर गर्भित ईशाराच सेनेशी बंडखोरी करणारेंना दिला आहे, 

दरम्यान शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना रायगड जिल्ह्यात थारा न देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी या निषेध आंदोलनात केल्याचे सांगणेत येत आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील तीनही आमदारांबाबत काही शिवसैनिक प्रंचड नाराज झाले आहेत, रायगडात ठिकठिकाणी अनेक चौकात शिवसैनिक बाळासाहेब, उद्धवजीं सोबत असल्याने फलक झलकत आहेत, सेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तसेच जिल्हाप्रमुख मात्र पुन्हा रायगडात शिवसेनेची बांधणी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत, शिवसेनेने ज्यांना घडविले, त्यांनीच शिवसेनेशी गद्दारी केली, शिवसैनिकांनी मोठ्या जिद्दीने तुम्हाला निवडुण दिले, त्यांचा अपमान तुम्ही आमदारांनी केला आहे, त्यामुळे आता परीणाम भोगावे लागतील असा सज्जड ईशाराही रायगड जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनदादा पाटील आणि रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना या शिंदे गटात गेलेल्यांना दिला आहे.

संबंधित पोस्ट