स्वामी गगनगिरी आश्रमात जागतिक योगदिन साजरा होणार !
- by Reporter
- Jun 17, 2022
- 473 views
खोपोली : सालाबादप्रमाणे याही वर्षी, विश्वगौरव विभूषित, परमसिध्द स्वामी योगीराज श्री गगनगिरी महाराज यांचे चैतन्यदायी समाधीस्थानी अर्थात पाताळगंगा तीर्थक्षेत्र योगाश्रम खोपोली येथे, श्री गगनगिरी योग प्रशिक्षण संस्थेद्वारे, जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने मंगळवार दि.२१ जून रोजी, सकाळी ७ ते ८.३० या वेळेमध्ये उपस्थित भाविक भक्तांना योगविषयक माहिती देऊन सर्वांकडून योगाभ्यास करून घेण्यात येईल.
तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी तसेच योगप्रेमी जनतेनी या स्थानी उपस्थित राहून सदर जागतिक योग दिनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे व योगाभ्यासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यांत आले आहे.

रिपोर्टर