मस्जिद बंदर स्टेशन रोडवर प्लास्टीक ताडपत्री फेरीवाल्यावर महापालिका बी विभाग मेहरबान

ताडपत्री चोरांना सोडून, आंब्यावाल्यांवर हलदे नावाच्या अधिकाऱ्याची दबंगगिरी

मुंबई.११ मे २०२२ : अनधिकृत फेरीवाल्यां विरोधात मुंबई महापालिका नेहमीच कारवाई करत असते.मात्र  आपल्या सोयीनुसार  कारवाई करणाऱ्या  मुंबई महापालिका व त्यांच्या अधिका-याविषयी  नेहमीच  संशय  व्यक्त करण्यासारखी परिस्थिती  निर्माण होते व हि कारवाई आहे का निव्वळ कारवाई करण्याचा  ' फार्स '   आहे  असा प्रश्न निर्माण होतो . 

मुंबई  शहरातील ' बी ' विभागातील मस्जिद बंदर हा  नेहमीच  गजबजटीचा  व वर्दळीचा आहे ,  दुपार  नंतर तर येथे  पाय ठेवायलाही जागा नसते.अरुंद गल्ल्या , हातगाड्या  त्यात रस्ते  व पदपथ  अडवून बसलेले फेरीवाले हि येथील नेहमीचेच चित्र त्यात मस्जिद स्टेशन बाहेरील युसूफ मेहरअली रोड  हा तर व्यापारीकदृष्ट्या महत्वाचा विभाग मोठमोठे ट्रक , हातगाड्या  त्यात चालत  मस्जिद स्टेशन गाठणे हि तारेवरची कसरत असते . त्यात  फुटपाथ हा  शोधूनही सापडणार नाही कारण संपूर्ण फुटपाथ हा दांगट फेरीवाल्यांची कब्जा केलेले.रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फेरीवाले एका बाजूला फ्लास्टीक ताडपत्री विकणारे दुसऱ्या बाजूला फळफ्रूट चॉकलेट, खजूर, बॅगचे फेरीवाले

कधी कुणी तक्रार केली कि पालिका नाममात्र कारवाई करत असते मात्र  पालिकेची  पाठ वळताच पुन्हा परिस्थिती  जैसे थे अशी राहते बुधवारी सायंकाळी महापालिकेचे एक गस्ती पथक या विभागात कार्यरत होते , त्या गस्ती पथकाचा अधिकारी मात्र आपल्या सोयीनुसार आपली ड्युटी निभावताना दिसत होता.काझी सय्यद  स्ट्रीट व युसुफ मेहरअली रोड पर्यंत पदपथावरील  दांडगे फेरीवाल्या वरील  कारवाई करण्याची सोडून  श्रीराम चौक येथे  एक पेटी ती पण उभी एक फूट आडवी अर्धा फूटाची  घेऊन बसलेल्या आंबेवाल्या लहान मुलावर  कारवाई करण्यात मग्न होते. या अधिकाऱ्याबरोबर असलेला त्याचा सहकाऱ्याने त्याला उठण्यास सांगितले. मात्र हलदे नावाच्या अधिकाऱ्याने दांडगाई करत पुन्हा त्या आंबेवाल्या  लहान मुलावर दादागिरी  करण्यास सुरुवात केली .  मात्र  पुढे जाताच  या अधिकाऱ्याने   कारवाई सौम्य करताच  फक्त कारवाई करण्याचे नाटक केले व  फक्त आपले  नावापुरते अस्तित्व  दाखवण्यास सुरुवात केली . त्या गरीब आंबेवाल्यावर कारवाई करण्याची हिम्मत दाखवणाऱ्या या अधिकाऱ्याने पुढे जाताच आपले शेपूट का आत घातले.का मराठी फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या  हा अधिकारी ठराविक समाजातील  दादागिरी करण्याऱ्या  फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास घाबरला का असा सवाल येथील दुकानदार , नागरिक व फेरीवाले करत आहेत.

संबंधित पोस्ट