समजात तेढ निर्माण करणाऱ्यांना साथ देऊ नका, समाजात शांतता-सलोखा राखा; गृहमंत्र्यांचे आवाहन !

मुंबई :के . रवि ( दादा ) औरंगाबाद येथील सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या 4 मे रोजीच्या अल्टिमेटमबाबत बोलताना महाराष्ट्र चे  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दोन समाजात  तेढ निर्माण करणाऱ्यानां , पेटवापेटवी करणाऱ्यांना साथ देऊन नका . सोबतच  समाजात शांतता-सलोखा राखण्याचे आवाहन ही गृहमंत्री दिलीप वलसे  पाटील यांनी केले आहे.


मुंबईत उद्या वरिष्ठांसोबत चर्चा करणार असून तोपर्यंत संभाजीनगरच्या सभेचा अहवाल प्राप्त होईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर चर्चेअंती निर्णय घेऊ, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. तसेच हिंदू असो की मुसलमान किंवा अन्य समाजाचे, सर्वांनी समाजात शांतता आणि सलोखा राखण्याचे काम करावे. कोणी कितीही पेटवापेटवी करण्याचे काम करायचा प्रयत्न केला तरी त्याला साथ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

संभाजीनगरच्या सभेमध्ये राज ठाकरे भोंग्याबाबत बोलले मात्र भोंग्याबाबत निर्णय त्यांनी घ्यायचा नाही. त्यांनी सभेमध्ये फक्त शरद पवार यांच्यावर टिका करणे आणि समाजात द्वेष कसा पसरेल, भावना कशा भडकतील हा हाच प्रयत्न केल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी केला. हे भाषण संभाजीनगरचे पोलीस आयुक्त ऐकतील आणि काय आक्षेपार्ह आहे, काय नाही याबाबत निर्णय घेतली. पोलीस आयुक्त आज व्हिडीओ बघतील आणि कुठे अटी-शर्तीचे उल्लंघन झाले हे पाहतील, त्यावर कायदेशीर सल्ला घेतील, त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतील आणि वरिष्ठ त्या संदर्भातील निर्णय घेतील.


राज ठाकरे यांच्या आरोपांमुळे शरद पवारांनी परिणाम होणार नाही. पवारांचे राजकीय आणि सार्वजनिक जीवन महाराष्ट्र आणि देशासमोर आहे. पवारांनी विकासाचे काम केले असून समाजाला एकत्र ठेवन्याचे आणि उभे करण्याचे काम केले. त्यांच्या हातून हजारो समाज विकासाचे  निर्णय झाले असून त्यामुळे महाराष्ट्रात आज समृद्धी दिसतेय. ज्यांच्यावजळ काहीच करायला नसते, ते पवारांवर आरोप करतात, असा टोला त्यांनी लगावला . 


दुसरे काही सांगायला नसते तेव्हा आस्तिक-नास्तिक मुद्दे काढले जातात. प्रत्येकाला राज्यघटनेनुसार आपला धर्म, जात, धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवार नास्तिक आहेत हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. त्याऐवजी त्यांनी देशातील महागाईबाबत बोलायला हवे. शरद पवार मुख्यमंत्री असल्यापासून भिमांशकर येथे येतात, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट