सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला ; शेअर बाजारात पडझड !

मुंबई .के . रवि ( दादा )  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर ६०० अंकानी सेन्सेक्स घसरला. 

अमेरिकन शेअर बाजारातही घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. 

शेअर बाजार सुरू झाला तेव्हा एक टक्क्यांहून अधिक घसरण सेन्सेक्समध्ये झाली. निफ्टीमध्ये १७८ अंकाची घसरण दिसून आली. 

निफ्टी निर्देशांक १६,९२४.४५ अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेक्स ५६,४२९.४५ अंकावर सुरू झाला. आज निफ्टीमधील ५० पैकी ४ शेअर्स वधारले आहेत. तर, ४६ शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीमध्ये ११५ अंकानी घसरत ३५९७३ अंकावर व्यवहार करत होता. बँक निफ्टी निर्देशांक ३६००० अंकाखाली घसरला आहे. 

प्री-ओपनिंग सत्रात घसरलेला सेन्सेक्स सकाळी ९.३० वाजल्यानंतर काही प्रमाणात सावरला असल्याचे चित्र होते. मात्र, बाजारात विक्रीचा दबाब असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

शेवटी शेअर बाजार हा शेर आहे ,जो वेलेनुसार नफा टोट्याचे  रंग बदलतो .

संबंधित पोस्ट