मुंबई में रस्ते की खुदाई कभी रुकती नही !? हि कहावत सत्यात उतरवणारी घटना

महापालिका बी विभागातील घटना

मुंबई ( मंगेश फदाले ) मुंबई में रस्ते की खुदाई कभी रुकती नही !?  हि  कहावत सत्यात  उतरवणारी  घटना  मांडवी कोळीवाड्यातील इसाजी स्ट्रीटच्या नाक्यावर घडली आहे!

याठिकाणी नवीन बनवलेला कॉंक्रिटचा रस्ता खोदण्यात आला आहे ! करोडो रुपये खर्च करून हा कॉंक्रीट चा रस्ता बनवण्यापूर्वी रस्त्याखालील सर्व कामे का उरकली गेली नाहीत ? हा महत्वाचा प्रश्न आहे !

सर्वसामान्य जनतेच्या कराचा पैसा असा उधळपट्टी करण्याचा अधिकार पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे का ?

असा सवाल मुंबईकर विचारत आहेत !

काँक्रीटचाच पक्का रस्ता बनवण्यापूर्वी एम.टी.एन. एल. आणि बेस्ट सह सर्व विभागांना सूचना देण्यात येते ! परंतु भंडारी स्ट्रीट या मशीद बंदर पश्चिमेकडच्या मार्गावरील नवीन रस्ता बनवण्या अगोदर  रस्त्याखालील सर्व कामे का करून घेण्यात आली नाही ? मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे का कानाडोळा केला ? आणि ह्या खोदकामाचा सर्व संबधित जबाबदार अधिकाऱ्याकडून खर्च वसूल केला जाईल का ?

हा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत !

ज्या ठिकाणी खोदकाम केले आहे ती जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बी विभागा अंतर्गत येते !

संबंधित पोस्ट