गडचिरोली पोलीस जवानांचा दबादबा निर्माण झाला आहे - गृहमंत्री

गडचिरोली (मंगेश फदाले )गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान कटेझरी येथील पोलीस इमारत लोकार्पण सोहळा आणि सी-६० जवानांच्या सन्मान कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. तसेच शौर्य स्थळाला भेट दिली !

यावेळी जवानांच्या पाठीशी संपूर्ण राज्य सरकार असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली. 

सी-६० जवानांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करताना मला खूप आनंद होत आहे. गेल्या दोन वर्षात आपण जी काही नेत्रदीपक कामगिरी केली आहे त्याची नोंद केवळ राज्यानेच नव्हे तर देशाने घेतली आहे! असे गृहमंत्री म्हणाले. 

मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस याप्रमाणेच गडचिरोली पोलीसांचा दबदबा निर्माण झाला आहे. सी-६० हे नक्षलवाद्यांचा बिमोड करणारे महत्त्वाचे दल असल्याची ओळख तयार झाली आहे. या दलाने दाखविलेले धैर्य आणि शौर्यामुळे नक्षली कारवायांना नियंत्रणात आणण्यात यश आले असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

आज सी-६० पथकाचा दरारा आहे.गेल्या दोन दशकात माओवाद्यांना चाप बसवण्यात पथकाला यश आलं आहे. सी-६० चा प्रत्येक जवान हा गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. या कामगिरीसाठी गृहमंत्र्यांनी सी-६० दलाचे अभिनंदन केले.

 सी-६० पथकाचे बळकटीकरण व आधुनिकीकरणाच्या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक असून प्राधान्याने त्यांना परवानगी देण्यात येत आहे. कर्तव्याला श्रेष्ठ माननाऱ्या जवानांसाठी आम्ही भत्ते, बक्षीसे, अतिरिक्त मानधन आदी प्रस्तावांना तातडीने मंजुरी दिली आहे. 

भविष्यात देखील पथकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, पुढील मागण्याही लवकरच पूर्ण करु. याबाबत सविस्तर माहिती मा. मुख्यमंत्री महोदयांना देणार असल्याचे गृहमंत्री यावेळी म्हणाले.

संबंधित पोस्ट