
दादर पुर्व येथे नाथपंथी गोसावी समाजाचे स्नेहसंमेलन संपन्न !
- by Reporter
- Apr 14, 2022
- 539 views
मुंबई : दादर पुर्व श्रीकृष्ण हॉल या ठिकाणी नाथपंथी गोसावी समाजाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले,गेली दोन वर्ष कोरोना सारख्या महाभयकंर महामारीचे अख्ख्या जगावर सकंट आले होते त्यामुळे राज्यशासनाने नियमावली बनवली होती दहा ते पंन्नास लोकांपेक्षा जास्त माणसानी जमू नये.परंतु दोन वर्षाने सगळे निर्बंध राज्य शासनाने हटवले या मुळे दोन वर्षाने स्नेह-संमेलनाचा कार्यक्रम नाथपंथी गोसावी समाजातर्फे श्रीकृष्ण हॉल दादर पुर्व येथे आयोजीत करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरूवात नवनाथांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली या कार्यक्रमाला नाथपंथी गोसावीसमाजाचे अध्यक्ष अनंत मंडपे,कोकण नाथपंथी महासंघाचे अध्यक्ष श्री.गणेश गोसावी.त्याच बरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कॉंग्रेस पक्षाचे मुंबईचे जनरल सेक्रेटरी मान.अमित ज.शेट्टी उपस्थित होते. या संमेलनात ,महिला अध्यक्षा अनिता बामणे यांच्या उपस्थितीत हळदिकुंकू समारंभ साजरा करण्यात आले,त्यावेळेस महिलावर्गात एक वेगळ्या उत्साहाचे वातावरण होते. हळदीकुंकू कार्यक्रमा दरम्यान अनिता बामणे म्हणाल्या,दोन वर्षाने का होईना पण आम्ही नाथपंथी गोसावी समाजाच्या महीला आज कोरोनाचे निर्बंध हटवल्या मुळे आम्हा सगळ्यांना भेटुन हळदीकुंकू सारखा कार्यक्रम समाजातल्या महिलांना एकञ येऊन साजरा करता आला,त्यामुळे राज्यशासनाचे आभार.माजी अध्यक्ष कै.बाळकृष्ण गोसावी यांनी समाजाला एक चांगली दिशा दिली समाजाला प्रगती पथावर नेलं त्यामुळे नाथपंथी गोसावी समाजाने त्यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार,पत्नी जोत्सना गोसावी यांना त्यांच्या संपुर्ण परीवारासमवेत प्रदान करण्यात आले.हा पुरस्कार स्विकारताना कै.बाळकृष्ण गोसावी यांच्या पत्नी जोत्सना गोसावी यांना दुःख अनावर झाले. भादाव गावचे संपर्क प्रमुख कै.काशिनाथ गोसावी यांना मरनोत्तर जीवन गौरव यांची पत्नी अनिता गोसावी यांना कुटंबासमवेत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक व्यवसायिक क्षेञात ऊल्लेखनिय काम केलं त्याबद्दल समाजाचे माजी अध्यक्ष श्री रविंद्र गोसावी व राजेंद्र मंडपे यांना समाजाने समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले त्या प्रसंगी रविंद्र गोसावी म्हणाले,आज स्पर्धेचे युग आहे मी सुद्धा मुंबई महानगरपालिकेत लिपिक या पदावर कार्यरत होतो परंतु मेहनत व शिक्षणाची असलेली ओढ आज मला वरच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली.समाजातील गोरगरीब गरजु मुले जी दहावी व बारावी परिक्षेत चांगले गुण प्राप्त करतात त्यांना प्रत्येक वर्षि त्यांच्या आईवडीलांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून विषेश शिष्यवृत्ती देण्यात येत असते.जेनेकरुन समाजातली मुलं ही शिकुनसवरुन पु़ढे गेली पाहीजेत हाच माझा समाजासाठीचा मुख्य ऊद्धेश आहे असे ते म्हणाले. श्री राजेद्र मंडपे म्हणाले माझी परिस्थिती शिक्षण घेत असताना आई वडील गावात मोलमजुरी करत होते सुदैवाने मोठ्या भावाला चांगली नोकरी होती त्यावेळेस माझा भाऊ कै रविंद्र मंडपे यांना श्री घारपुरे म्हणाले की,तुझ्या भावाला पदवीपर्यंत शिकव मी दापोली अर्बन बॅंकेत कामाला लावतो,मी आज आहे ते त्यांच्या मुळे तेही बॅंकव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे.त्यानतंर प्रमुख ऊपस्तिथी लाभलेले मुबंई कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख पाहुणे मुंबईचे सेक्रेटरी अमित जगन्नाथ शेट्टी यांच्याशी चर्चा केली असता म्हणाले "नाथपंथी गोसावी समाज हे माझे घर आहे आणि समाजातले कार्यकर्ते हे माझे बांधव आहेत" समाजाच्या काही अडचणी असतिल मग ते समाज मंदीर असो अथवा आरंक्षाचा प्रश्न असो किंवा कोणाला काही अर्थिक संकट असो मला हाक मारली तर मी ताबडतोब हजर होईन माझ्या वडीलांनी या समाजासाठी बहुमुल्य कामा केलं आहे मीही करेन असे म्हणाले.
त्याच बरेबर "एक हात मदतीचा"गरजु ज्यांचे आई किंवा वडील नाहीत अशा लोकांना वह्या पुस्तके दफ्तर पेन पेन्सिल शाळेत लागणार्या वस्तु प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्यक्षात भेट घेऊन लोकांना समजाऊन जमाजातल्या लोकांनपर्यंत पोहचने व त्या विध्यार्थ्यांना भेटने त्यांची विचारपुर करुन एक हात मदतीचा पुढे करणे यासाठी किरण गोसावी किरण पालवणकर अरुण जोगी राजेंद्र मुरकर अदि लोकांचा या मध्ये समावेश आहे.श्रृती जोगी अभिषेक बामणे यांचा शैक्षणिक क्षेञात चांगले गुण मिळाल्याबद्दल त्याचा नाथपंथी गोसावी समाजातर्फे विषेश शिष्यवृती देऊन सत्कार करण्यात आले. यावेळीस समाजाच्या कार्यकारीणीचे पुष्पगुच्छ देऊन समाजाने विषेश आभार मानले.या कार्यक्रमात मोठ्या संख्ये समाज बांधव दहा वाजल्यापासुन सात वाजेपर्यंत अवर्जुन ऊपस्तिथ होते.या कार्यक्रमांत सांस्कृती लहान मुलांचे नाच गाण्याचा कार्यक्रम घेऊन संपन्न झाले.
रिपोर्टर