राज ठाकरेंचा मोठा निर्णय, वसंत मोरेंना शहराध्यक्षपदावरून हटवलं; पुणे मनसेत खळबळ

पुणे, ७ एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. पण, पक्षातूनच त्यांच्या भूमिकाला विरोध झाला. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे  यांनी विरोध दर्शवला म्हणून आता त्यांना बाहेरच रस्ता दाखवला आहे. पुणे शहराध्यक्षपदी आता  नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची निवड केली आहे. राज ठाकरेंच्या निर्णयामुळे मनसेत खळबळ उडाली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क  येथे आयोजित मनसे मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेतला. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. सध्या राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मशिदीवरील भोंग्यांवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या मुद्द्यावरून मनसेतही अंतर्गत नाराजी निर्माण झाल्याचंही दिसून येत आहे. याच मुद्द्यावरुन आता मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

'आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात त्यांनी हनुमान चालीसा लावली. मी माझ्या प्रभागात असे काही करणार नाही आहे', असं वसंत मोरे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

वसंत मोरे यांच्या या निर्णयामुळे मनसेत खळबळ उडाली. अखेर शिवतीर्थावर याची दखल घेतली गेली. दोन दिवसांपासून वसंत मोरेंना हटवण्याबाबत हालचाल सुरू होती. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं.

संबंधित पोस्ट