बेस्टची बेस्ट ग्राहकांना देयक भरणासाठी बेस्ट मोबाईल व्हॅन सुविधा

आज बेस्ट मुख्यालयात सकाळी लोकार्पन सोहळा

मुंबई : ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत. मुंबईकरांच्या सेवेत बेस्ट देयकाचा भरणा करण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात येणार आहे. या मोबाईल व्हॅन वर बेस्ट वीज बिलासह पाणी, मालमत्ता कर, फास्ट टॅग रिचार्जची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या मोबाईल देयक भरणा केंद्राचा लोकार्पण सोहळा  आज सकाळी ११.३० वाजता कुलाबा येथील बेस्टच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

पहिल्या दिवशी वरळीला प्रेमनगर भागात हे केंद्र उभे राहणार आहे वीज ग्राहकांना त्यांच्या वीज देयकाचे प्रदान सुलभ रीतीने करण्याच्या दृष्टीने भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळाद्वारे डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत प्रणालीचा वापर करून मोबाईल देयक भरणा केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. वीज देयकांव्यतिरिक्त पाणी, मालमत्ता आणि इतर महापालिका सेवाकर, गॅस, डीटीएच क्रेडिट कार्ड, फास्ट टॅग रिचार्ज, बेस्टच्या किऑस्क आणि इतर देयकांचे प्रदान करण्याकरिता मोबाईल देयक भरणा केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित पोस्ट