नाविण्य मित्र मंडळ संचालित हरिभाऊ सैलाजी रूपवते वाचनालय व खुल्या व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न

 मुंबई: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील सेनानी कालकथित हरिभाऊ सैलाजी रूपवते यांच्या स्मरणार्थ नाविन्य मित्रमंडळातर्फे श्रावस्ती बुद्ध विहार मैदान, गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे चालविण्यात येत असलेल्या वाचनालयाचे उद्घाटन तत्कालीन राज्याचे समाज कल्याण मंत्री व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक मनोहर जाधव यांच्या मूळ संकल्पनेतुन वाचनालयाची निर्मिती करण्यात आलेली असून,
 मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सुधाकर रूपवते यांच्या नव  संकल्पनेतून वाचनालयाचे नूतनीकरण व खुल्या व्यायाम शाळेची उभारणी करण्यात आली या कामी मुंबई प्रदेश अध्यक्ष कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या आमदार निधीतून मदत करण्यात आली.
       नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी  उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेले ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते व समाज सेवक श्रीधर शेलार यांच्या पाठपुराव्यामुळे वाचनालयाचे नूतनीकरण व  खुली व्यायाम शाळेला मूर्त स्वरूप मिळाले असा खास उल्लेख मंडळाचे अध्यक्ष सुधाकर रूपवते यांनी केला.
    सदर उपक्रमाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा नुकताच शनिवार दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी मुंबई काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमांसाठी अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्वश्री सुनील वानखेडे, विकास धवन, प्रकाश धवन, राहुल बोरकर, श्रीकांत कर्डक, अविनाश जाधव, धर्मेंद्र बोंढारे, राजेंद्र जाधव, सुहास(भाऊ) जाधव, दीपक जगताप, रवींद्र थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले तर रविराज निरभवणे व श्रीमती प्रीती निरभवणे यांचे विशेष सहाय्य मंडळास लाभले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट