महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या दहावी- बारावीच्या परीक्षांचा निकाल लागणार उशिरा
उशिरा निकाल लागल्यास त्याला जबाबदार महाराष्ट्र शासन- संजय डावरे - मुंबई अध्यक्ष
- by Reporter
- Mar 25, 2022
- 410 views
विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी पेपर तपासण्यास नाकारल्यामुळे शिक्षणमंडळ धर्मसंकटात
मुंबई : मुंबई विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी, नवी मुंबई यांच्या कार्यालयात मुंबई विभागातील विनाअनुदानित शाळातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विभागीय सचिव यांची भेट घेऊन शिक्षक उत्तरपत्रिका तपासत नाहीत याची माहिती दिली. विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे साहेब यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोसावी साहेब यांच्याशी संपर्क साधून २४ फेब्रुवारी २०२२ रोजी उपरोक्त संघटनेच्या वतीने दिलेले निवेदना नुसार परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल असे सांगितले होते त्या पत्राला अनुसरून मुंबईतील व महाराष्ट्र तील सर्व शिक्षकांनी दहावी व बारावी परीक्षा मार्च २०२२ झालेल्या परीक्षेचे उत्तरपत्रिका तपासणीसाठी आलेल्या आहेत मात्र शिक्षकांनी त्या उत्तर पत्रिका आद्यपही तपासलेल्या नाहीत. यानंतर सन्माननीय विभागीय सचिव सुभाष डॉक्टर सुभाष बोरसे साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन सदर निवेदन राज्य शिक्षण मंडळ व शिक्षण मंत्री कार्यालय यांना मेल द्वारे कळविण्यात आले. तरी आमच्या मागण्या बाबतीत जो पर्यंत निर्णय घेतला जात नाही तो पर्यंत हे आंदोलन चालूच राहील त्याचप्रमाणे पेपर हे कोणत्याही परिस्थितीत तपासले जाणार नाहीत यामुळे दहावी बारावीचा निकाल उशिरा झाल्यास त्याला कारणीभूत हे शिक्षक नसून शासन असेल !! मुंबई अध्यक्ष संजय डावरे यानी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले .
संपूर्ण महाराष्ट्रात विनाअनुदान शाळा कृती समितीने इ १० वी व १२ वी पेपर तपासणी वर बहिष्कार टाकत असलेबाबत २१ फेब्रुवारी २०२२ रोजी शासनास पत्र दिले आहे तसे बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, यांना त्याच वेळी कळविले आहे, असे असताना ही बोर्डाने पेपर पाठविले आहेत,बहिष्कार असल्याने कोणीही पेपर सोडवून घेतलेले नाहीत,त्यामुळे बोर्डातून अनेक अधिकारी यांनी अनेक शिक्षकांना धमकीचे फोन आले, तसे रेकॉर्डिंग ही उपलब्ध झाले आहे, काहींना बोर्डाची मान्यता काढून घेणे बाबत पत्र दिलेली आहेत,जेणेकरून चाललेले बहिष्कार चे आंदोलन विस्कळीत व्हावे,
अशा धमक्यांना घाबरू नका
गेली २२ वर्षे विनामोबदला काम करताना संबंधित अधिकारी यांना आमचे हाल दिसले नाहीत का,जर एवढी शासनाची काळजी असेल तर आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत शासनास कळवावे,पण दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, त्याच्याच कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी आम्ही न्यायासाठी झगडत आहोत हे ठेवावे,त्यामुळे शिक्षकानी घाबरू नये आपल्या पाठीशी संघटना ठामपणे उभी आहे.

रिपोर्टर