विसावा शुद्ध शाकाहारी हॉटेलच्या पदार्थांमध्ये आढळली चिकनची हड्डी ग्राहकाकडून कारवाईची मागणी!..

नवी मुंबई एपीएमसी तुर्भे येथील सेक्टर  १९ प्लॉट नंबर ६ येथील विसावा शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये चक्क मांसाहारी चिकनची हड्डी मिळाल्याने शाकाहारी खाणाऱ्या खवय्यांन मध्ये एकच खळबळ उडाली आहे

विसावा शुद्ध शाकाहारी हॉटेल या हॉटेलची विश्वासनीय हॉटेल अशी ओळख निर्माण झालेले आहे खाण्याच्या पदार्थामध्ये चक्क मांसाहारी चिकनची हड्डी  पदार्थांमध्ये आढळून आल्याने शुद्ध शाकाहारी खाणाऱ्या  खवय्यांसाठी मोठी निराशाजनक बातमी समोर आल्याची चित्र हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांना दिसत आहे

याबाबत माहिती अशी की रविवार  असल्याकारणाने नवी मुंबईतील नागरिक आपल्या पद्धतीने दुपारच्या जेवणाकरिता हॉटेलची निवड करत असतात वेज खाणारे नागरिक शक्यतो जिथे शंभर टक्के शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था असते अशा हॉटेलमध्ये जाण्यासाठी त्यांचा कल असतो मात्र शुद्ध शाकाहारी हॉटेलचे फलक लावून हॉटेल व्यवसायिक नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे चित्र रविवारी विसावा शुद्ध शाकाहारी हॉटेल मध्ये बघण्यास मिळाले 100% शुद्ध शाकाहारी हॉटेल  असणाऱ्या विसावा या हॉटेलमध्ये एका ग्राहकाने पनीर टिक्का नावाचे पदार्थाची मागणी केली मागणीनुसार हॉटेल व्यवस्थापकाने त्यांना पनीर टिक्का हा पदार्थ आणून दिला मात्र त्या पदार्थाचे सेवन करत असताना पनीर टिक्का या पदार्थांमध्ये त्यांना चक्क मांसाहारी चिकनची हड्डी मिळून आली कधीच मांसाहारी पदार्थाचे सेवन न करणाऱ्या या ग्राहकाला आपला राग अनावर झाला त्याने हॉटेल व्यवस्थापकाला  बोलून शुद्ध शाकाहारी हॉटेल च्या पदार्थांमध्ये चक्क मांसाहारी पदार्थ असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने हॉटेल व्यवसायाची भांबेरी उडाली. त्याने थातुरमातुर उत्तर देऊन ग्राहकाचे समाधान करण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान: सबंधित प्रकार अत्यंत गंभीर असून ग्राहकांच्या  विश्वासार्हतेला तडा जाणार आहे तरी हॉटेलचा परवाना त्वरित रद्द करून कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे..

संबंधित पोस्ट