मुंबईत २४ वाॅर्डातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या रखडल्या

मुंबई : मुंबई महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी (एमओएच) यांच्या बदल्या गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. यामुळे आता मर्जीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी, यासाठी विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी यांची सेंटिंग लावण्यासाठी धावपळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्ग मुंबईत  ओसरला असल्याने मुंबई महापालिका आयुक्तांनी आतातरी वैद्यकीय अधिकारी यांच्या बदल्या करतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

गेल्या ४ ते ५ वर्षांपासून एकाच पालिका विभाग कार्यालयात ठाम मांडून बसलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून नियमबाह्य कामे केली जात आहेत. तर

काही विभाग कार्यालयात या अधिकार्‍यामार्फेत कोविडमध्ये बेकायदा कामे झाल्याचे उघडकीस आले आहेत. अशावेळी महापालिका प्रशासन आणखी किती दिवस वैद्यकीय अधिका~यांच्या बदल्या रखडून ठेवणार आहेत.

मर्जीच्या ठिकाणी पोस्टिंगसाठी आर्थिक व्यवहारांची भीती

मर्जीच्या ठिकाणी किंवा प्रशासनाकडून मिळणारे पोस्टिंग रद्द करण्यासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी आतापासूनच माजी नगरसेवकांसह आमदारांना हाताशी धरून आपले काम फत्ते करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे या बदल्यामध्येही मोठ्या प्रमाणात  आर्थिक व्यवहार होवू शकतो, असा संशय एका माजी नगरसेवकाने व्यक्त केली. यामुळे महापालिका आयुक्त यांनी नि:पक्षपणे वैद्यकीय अधिकारी यांच्या बदल्या करण्याची मागणी पालिका वर्तुळात करण्यात येत आहे.

वैद्यकिय अधिकारी यांची कामे –

जन्म,मृत्यू आणि विवाह नोंदणी करणे, साथ रोगाचे निदान करणे, हाॅस्पिटल, नर्सिग होमची तपासणी, कारवाई करणे, नॅशनल कार्यक्रमाची जनजागृती करणे, रेस्टाॅरेंटला लायसेन्स देणे असे आरोग्यविषयी विविध कामे करावी लागतात.

संबंधित पोस्ट