कांदिवली पुर्व वाॅर्ड नं. २७ च्या मनसे शाखा अध्यक्ष अक्षय येडगे यांचे आर/ दक्षिण मनपा कार्यालयात अनोखे आंदोलन शर्टवर लिहले आतापर्यत केलेल्या सर्व पञ व्यवहाराची माहीती
- by Reporter
- Mar 09, 2022
- 647 views
मुंबई : कांदिवली (पू) येथील दामुनगर मार्गी जाणा-या व्हाईट सिटी प्रोजेक्ट समोरील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करत दुकानाचे गाळे उभारण्यात आले आहे यासंदर्भात सन २०१९ मध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त कू-हाडे साहेब यांना तक्रार केली होती.नमुद ठिकाणी अनधिकृत सर्विस सेंटर ,मंदिर ,दुकानाचा गाळा उभारण्यात आला असल्याचे पालिकेस कळवत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पञ दिले वारंवार पञव्यवहार देखील करण्यात आला.
या ठिकाणाच्या अनधिकृत बांधकामात क्लब तसेच गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री जोरात सुरू झाली.यावर आळा घालण्यासाठी अवैध बांधकाम पाडून टाकणे हा प्राथमिक उपाय असल्याचे पालिकेला सांगितले.तसेच कारवाई करण्याचे पालिकेने ही आश्वस्त केले.परंतू कारवाई झाली नाही.आज दिड वर्षापासून या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करत आहे.याच जागी शाळकरी मुलांचा वावर सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.तसेच राञभर असलेल्या गर्दुल्यांमुळे रहदारी तसेच महिला वर्गासोबत भविष्यात ऐखादे अपकृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची तक्रार प्रत्यक्ष भेटून समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना दिली होती.याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त, परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त,पोलीस आयुक्त यांना ही तक्रार देण्यात आल्या.
परंतू यासंदर्भात ठोस कारवाई का झाली नाही ,हा संशोधानाचा विषय.
सर्व घटनेस अनुसरून बांधकामावर हातोडा पडावा या हेतूप्रित्यर्थ काल पालिकेच्या आर /दक्षिण विभागाच्या (दुकाने व कारखाने ) अधिका-यांना भेटलो.अधिकारी वर्ग केलेल्या तक्रार विसरतयं का असं मला वाटत असल्याने आजपर्यंतचा सर्व पञ्यव्यवहार शर्टवर लिहून गेलो.दोन महिने अगोदर बांधकाम पाडण्याची (demolition notice) नोटीस संबधित बांधकाम करणाऱ्यांना देऊन ही कारवाई का केली नसल्याचा जाब अधिका-यांना विचारला.
पूनश्य नोटीस काढावी म्हणून ठिय्या घातला तातडीने विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, अधिका-यांनी बांधकामावर कारवाई संदर्भात नोटीस काढली. व तत्सम बाब समतानगर पो. ठाणे यांना कळवणार असल्याचे सांगितले

रिपोर्टर