तलासरीत कै. माधवराव काणे रुग्ग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन
- by Reporter
- Mar 09, 2022
- 387 views
तलासरी दि.९ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तलासरी मार्फत ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तलासरी परिसरातील गरीब, गरजू रुग्णांसाठी कै. माधवराव काणे रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन मा.मीनाताई पास्कल धनारे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनकल्याण समितीचे तालुका कार्यवाह संतोष पिंगळे यांनी जनकल्याण समितीची ओळख करून देत व्हील चेअर, कंबोर्ड,वॉकर,स्टिक आदी १६ प्रकारचे साहित्य केंद्रासाठी मिळाले असून सदर साहित्य गरीब गरजवंताच्या सेवेत नाममात्र शुल्कात दाखल झाल्याची माहिती दिली. सदर उपक्रम साठी धनारे परिवारातर्फे एक प्रशस्त कार्यालय दोन वर्षासाठी विना मोबदला उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीच्या वतीने त्यांना धन्यवाद व्यक्त करण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक मधुदादा ठाकरे,माजी सैनिक लक्ष्मण वरठा, जिल्हा कार्यवाह भानुशाली,वीर सावरकर रक्तदाता संघाचे अध्यक्ष पिंगळे, ए. बी. व्ही. पी. चे अमित झा, धारणे ,प्रकाश सेवक ,टाईम कंपनीचे काळपांडे साहेब,त्रिपाठी ,रुपाली मलावकर ,सिंधुताई पिंगळे, सुभाष वसावला, छबु फड, लक्ष्मीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.यासाठी जनकल्याण समितीचे सदस्य दत्तात्रय शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वसावला यांनी केले.
रिपोर्टर