मराठी भाषिक राज्य हडपण्यासाठी उपऱ्यांची टीवटीव

मुंबई(दीपक शिरवडकर) - येनकेन प्रकारे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याचे स्वप्न स्थानिक भुमिपुत्रांपेक्षा महाराष्ट्राने ज्यांना मोठे केले, मानसन्मान दिला असे उपरेच करताना दिसत आहेत. कोण्या सेलिब्रिटीचे बांधकाम पालिकेने तोडले म्हणून केवढी टिवटिव.तर कोण्या सेलिब्रिटीनी आत्महत्या केली तर केवढे राजकारण.पण महाराष्ट्रा .बद्दल,राज्यातील लोकसेवकाबाबत छत्रपतींबद्दल,महात्म्यांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांची पाठराखण केली जाते याला मराठी माणूसच जबाबदार म्हटला पाहिजे करोनासारख्या महामारीवेळी अशांतता पसरविणारे काय साध्य करतात?गरिबाची झोपडी तोडली तर चिवचिवाट करणारे गायब असतात. आज कित्येक उपरे बिल्डर सर्व सामान्यांची बेकायदा इमारती बांधून फसवणूक करीत असताना टिवटिव करणारे त्याबाबत 'ब्र' काढत नाहीत.तर काही लोचट शासकीय अधिकारी अशा बेकायदा बांधकामा ठिकाणी खरेदी विक्री-करार हौसिंग सोसायटी,पाणी,वीज इतर नागरिक सुविधा देऊन सर्वसामान्य मराठी माणसांची फसवणूक करतात पण त्याबाबत एकही राजकारणी बोबंलताना दिसत नाहीत. 

स्थानिक भुमिपुत्रांना न्यायासाठी भटकावे लागते तर उपऱ्यांसाठी पायघड्या टाकल्या जातात;कडक पोलीस बंदोबस्त दिला जातो मराठी माणसाची अशी बडदास्त इतर राज्यात ठेवली जात नाही, पण उपऱ्यांना या महाराष्ट्रात मोकळे रान दिले जाते. मानाची पदे दिली जातात. मुंबईचा,मराठी माणसाचा मराठी भाषेचा, मराठी संस्कृती परंपरेचा, मुंबई पोलिसांचा उपऱ्यानी कितीही अपमान केला तरी सत्तेचे राजकारण करणारे काही मराठी राजकारणी अपमान करणाऱ्यांची तळी उचलून धरतात.तर चवली-पावलीच्या आमिषाने काही मराठी माणसे आपला स्वाभिमान सोडून उपऱ्याचे बटिक झालेले दिसतात.मराठी बाणा-मराठी कणा उपऱ्यांसमोर मोडून पडतो.मराठी माणसाला आव्हान देणारे त्यामुळे मस्तवाल होतात मराठी माणसा जागा हो,अशाने मुंबई आमच्या बापाची ह्या घोषणा पोकळ ठरतील व ही मुंबई हातची जाईल.तशी ती काही अंशी हातातून गेल्यातच जमा आहे.मराठी माणसाचा टक्का घसरत आहे.

सत्तेसाठी उतावळे झालेले डोक्यावर पडल्या सारखे करतात याचे दु:ख वाटते सत्ता चालवता येत नाही तर राजीनामा द्या सांगणारे हातात सत्ता असताना काय दिवे ओवाळतात?

आज लडाखमधील हिंदुस्थानची ३८हजार चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावली आहे.नेपाळनेही घुसखोरी केली आहे भारतात अतिरेकी घुसत आहे अमली पदार्थ पाठवत आहेत,सीमेवर भारतीय जवान शहीद होत आहेत. तर भारतीय स्वातंत्र्यावर आणि स्वातंत्र्य योध्यांवर काही माथेफिरू आक्षेप घेत आहेत आणि अशाना काही भारतीयच पाठिंशी घालत आहे त्यांना पुरस्कारानी सन्मानित केले जात आहे हे दुदैवच मानले पाहिजे.सत्तेसाठी गुण्या-गोविंदाने नांदणाऱ्या हिंदु-मुस्लिम,ओबीसी-मराठा,शेतकरी-कष्टकरी-विद्यार्थी यांच्यात  विनाकारण आरक्षणाचा वाद निर्माण करून दंगली घडविल्या जात आहे स्वातंत्र्य सैनिकानी याचसाठी आपले बलिदान देत अट्टाहास केला होता का?  देशातला शेतकरी कष्टकरी आदिवासी,बाराबलुतेदार देशोधडीला लागले आहेत अन राजकारणी करोडोनी संपत्ती करत आहेत. आर्थिक घसरण होत आहे, बँक घोटाळ्यातील तब्बल ३८ आरोपी देशाबाहेर पळून गेले आहेत. उपऱ्यांना विनाकारण जनतेच्या पैशातून सुरक्षा पुरविली जात आहे.मराठी भाषीक राज्यात अन्य राज्यातून आलेल्या उपऱ्यांची तळी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली मिडियासह अन्य का उचलून धरतात तेच कळत नाही. गिरणी कामगार, माथाडी कामगार त्यांना मिळालेल्या सरकारी सदनिका चढया भावाने प्रशासनाला हाताशी धरून विकताना पाहून दु:ख होते.सरकारी क्षेत्रातील उद्योगाचे खासगीकरण केले जात आहे. सर्व बँकाचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न होत आहे, विकासाच्या नावाखाली मुंबईसह महाराष्ट्र भकास करण्याचे कारस्थान राज्यातीलच फंदफीतुराना हाताशी धरून उपरे करीत आहेत हे कटू सत्य आहे.याबाबत टिवटिव करणारे चिडिचूप असलेले दिसतात कामगारांना-शेतकऱ्यांना भडकावून आंदोलने पेटवली जातात व राजकारणी आपल्या पोळया भाजून घेतात.

उच्च शिक्षित तरुण दुसरी नापास असणाऱ्याला मतदान करून त्याला आमदार-खासदार नगरसेवक म्हणून निवडून देतात येथे मात्र शैक्षणिक पात्रता आढ येत नाही.हीच लोकशाही?

                        

संबंधित पोस्ट