पोर्ट ट्रस्टचे अधिकारी किशोर आपटे यांचे निधन
- by Reporter
- Mar 06, 2022
- 357 views
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त सचिव, मुख्य यांत्रिक अभियंता तसेच जे. एन. पी. टी. व कोचीन पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त उपाध्यक्ष किशोर आपटे यांचे नवी मुंबई मध्ये वाशी येथे ३ मार्च २०२२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
किशोर आपटे यांनी नोकरीच्या कालावधीत कामगार व अधिकाऱ्यांना चांगले सहकार्य केले. त्यामुळे त्यांची कामगार व अधिकारी वर्गात चांगली लोकप्रियता होती.
त्यांचा अंत्यविधी तुर्भे येथील स्मशानभूमीत झाला.मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव व मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने मनोहर देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर किशोर आपटे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त मुख्य यांत्रिक अभियंता गोविंदराजन, शंकर नारायण, सेवानिवृत्त ट्राफिक मॅनेजर सी. एस. मूर्ती, पी.के. अब्राहम, सेवानिवृत्त पोर्ट ट्रस्टचे अधिकारी वर्गीस, प्रशासकीय अधिकारी उचील, नगरसेवक इथापे, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबचे सेवानिवृत्त पदाधिकारी रवी शिंदे, आदी मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.

रिपोर्टर