केईएम रुग्णालयात महिलांचे रक्तदान" घे भरारी रक्तदानासाठी

मुंबई (प्रतिनिधी) ८ मार्च हा 'जागतिक महिला दिन.! म्हणजे सर्व महिलांचा अभिमानाचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून गेली दोन वर्ष के.ई.एम. रुग्णालय रक्तपेढी आणि जीवनदाता संस्था याच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते.

याप्रसंगी केईएम रुग्णालयातील समस्त महिला डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी व इतर महिला स्टाफ रक्तदान शिबिरात सहभाग घेत असतात, याही वर्षी सर्व महिलांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती कविता ससाणे, समुपदेशक ब्लड बँक, के ई एम रुग्णालय, परेल, यांनी केले आहे.



संबंधित पोस्ट