कांदिवली पूर्व येथील श्रीराम नगर येथे बांधण्यात आलेले दुमजली शौचालय उद्घाटन केल्यानंतर अवघ्या १० दिवसात बंद
- by Reporter
- Mar 04, 2022
- 591 views
मुंबई : आर /दक्षिण मनपा हद्दीत असलेल्या श्रीराम नगर येथे जुने शौचालय तोडून दुमजली शौचालय बांधण्यात आले असुन शौचालयाचे उद्घाटन २२ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले मात्र शौचालयाच्या मलनिसारण टाकीचे मल थेट गटारात सोडण्यात आले.परंतु स्थानिकांनी सदर बाब कळताच शौचालय बंद करण्यात आले खरे तर दुमजली शौचालय बांधण्यात आले तेव्हा मलनिसारणची लाईन का टाकण्यात आली नाही? असा सवाल स्थानिक नागरीक करत आहेत तसेच मनपा अभियंते हे नेमके काय करतात हा प्रश्न नागरीकांना पडला आहे.कंत्राटदारानी अर्धवट केले का त्यांने काम वेळेत का केले नाही? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे कांदिवली तालुका अध्यक्ष विकास शिरसाठ तसेच वॉर्ड अध्यक्ष जितेंद्र मर्चडे यांनी शौचालय नागरीकांसाठी चालू करावे यासाठी स्थानिक आमदार अतुल भातलकर तसेच स्थानिक नगरसेवक शंकर हुंडारे तसेच मनपा आर/दक्षिण कार्यालयाला लेखी तक्रार ही केली असुन संबधित गैर कारभारामुळे स्थानिक नागरीकांना असुविधा होत असुन संबधित लोकांवर कारवाई करावी अशी मागणी ही केली आहे.
सध्या मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत अश्यातच नारळ फोडण्याची स्पर्धाच चालु आहे अपुर्ण कामाचे ही सध्या उद्घाटन जोरात चालु आहेत अश्यात सर्वसामान्य लोक मात्र भरडत आहे.

रिपोर्टर