घनकचरा व्यवस्थापन विभाग सहा. अभियंता चित्रांगद कुलकर्णी चार दिवस वैद्यकीय रजेवर गेले काय आणि बी विभागात बजबजपुरी झाली काय !.

मुबई:( विशेष प्रतिनिधी)  घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रभारी असलेले सुशांत रत्नपारखी (उपअभियंता) यांनी आपल्या अकार्यक्षमतेची झलक थोडयाच कालावधीत  दाखवून दिली आहे.

बी विभागात अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेले सांडपाणी आणि दुर्गन्धी हा विषय सध्या नागरिकांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा झाला आहे .


सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ खेळणारे अधिकारी मात्र वातानुकूलित कॅबिन मध्ये फक्त खुर्ची उबवण्याचे काम करत आहेत.

सुशांत रत्नपारखी यांच्या बेजबाबदार पणाचे दर्शन घडले असून त्यांना प्रभारी पद झेपले नसल्याचं सिध्द झालं आहे.तसेच खात्यातील कनिष्ठ कर्मचार्यांशी घमेंडीत बोलून त्यांनी आपल्या अहंकारी वृत्तीचं सादरीकरण केलं आहे.अनेक कनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वर्तुळात ते 'अशांत दगड-पारखी' या नावाने कुप्रसिध्द असल्याचे सूत्रांनी आदर्श महाराष्ट्रला  सांगितले .

बी वॉर्ड मधील सांडपाणी निचरा करणारी यंत्रणा अधिक सक्षम करून विभागात स्वच्छता असावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.

सध्या  चित्रांगद कुलकर्णी ( सहा.अभियंता घ.क.व्य. ) यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असून ते गृह विलगीकरणात आहेत !

श्री.चित्रांगद कुलकर्णी पुन्हा सेवेत रुजू होईपर्यंत कार्यक्षम अधिकाऱ्याची प्रभारी म्हणून नेमणूक घनकचरा व्यवस्थापन विभाग सहा.अभियंता या पदावर करण्यात यावी अशी मागणी बी वॉर्डच्या अंतर्गत वर्तुळातून होत आहे.

संबंधित पोस्ट