
घाटकोपर मधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश
- by Reporter
- Dec 13, 2021
- 324 views
घाटकोपर : घाटकोपर (पूर्व)विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी (आज रवि दिनांक १२ रोजी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर(पूर्व) विभाग अध्यक्ष संदीप कुलथे व महिला विभाग अध्यक्ष कविताताई राणे यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी घाटकोपर (पूर्व) येथील प्रभाग क्रमांक १२५ ,१३०,१३१,१३३ मधील भारतीय जनता पार्टी ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील संतोष पिंगळे,लतीशा खैरनार ,सुनील जाधव,जुनेद शेख,हबीब शेख,आकाश सोनवणे आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश होता .
आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सर्व पक्ष आपले संघटन अधिक मजबूत करण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. आज मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये विविध पक्षातील महिला कार्यकर्त्यां व पदाधिकारी यांचा देखील मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
रिपोर्टर