योगीराज श्री गगनगिरी महाराजांचे खोपोली येथील आश्रमांत श्रीदत्तजयंती उत्सवाचे आयोजन!

खोपोली : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वामी श्री गगनगिरी महाराज यांचे खोपोली (रायगड) येथील पाताळगंगा तीर्थक्षेत्री असलेल्या चैतन्यदायी समाधीस्थानी श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यांत आले आहे. 

या निमित्ताने श्रीदत्तजयंती दिनी शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी पहाटेपासून, समाधीस्थानी धार्मिक कार्यक्रमांस  प्रारंभ होणार असून सायंकाळी श्री दत्तजन्म सोहळा संपन्न होईल. 

सदर उत्सवाच्या निमित्ताने आश्रमस्थानी भजन-पूजन - नामस्मरण -लघुरुद्र - दत्तझोळी - होमहवन भंडारा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यांत आले असून सर्वांना महाप्रसाद देण्यात येईल. 

वरील धार्मिक उत्सवास येणाऱ्या भाविक भक्तांनी शासकीय आदेशानुसार, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत, रांगेत सुरक्षित अंतर ठेवून , "स्वामी गगनगिरी  महाराजांचे " चे दर्शन - आशीर्वादाचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यांत आले आहे

संबंधित पोस्ट