समाजसेवक दिपक जाधव यांच्या कार्यतत्परतेमुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले

मुंबई,  : गोरेगाव-पश्चिम येथील बेस्ट नगर वसाहतीच्या बाजुला असलेल्या नाल्याजवळ गेल्या एक महिन्यापासुन खोदलेल्या रस्त्यावरिल खड्डा बुजविलेला नव्हता. दोन दिवसापूर्वी या रस्त्यावरून जाताना बाईकस्वाराला अपघात झाला. याची दखल घेऊन लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक जाधव यांनी स्वतः सदर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांना मेसेजमार्फत कळवले. जाधव यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सदर रस्त्यावर पडलेले खड्डे चोवीस तासाच्या आत बुजवण्यात आले. दिपक जाधव यांच्या कार्यतत्परतेमुळे सदर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.
मोतिलाल नगर नं.१, गजानन महाराज मंदीर मार्ग, गोरेगाव-पश्चिम येथील बेस्ट नगर वसाहतीच्या बाजुला असलेल्या नाल्याजवळ गेल्या एक महिन्यापासुन खोदलेल्या रस्त्यावरिल खड्डा अजुन पर्यंत बुजविलेला नाही. २६ नाेव्हेबर २०२१ रोजी र‍ात्रीच्या वेळेस एका मोटारसायकल स्वराचा अपघाती मृत्यू होता होता वाचला. परंतु तो सध्या के.ई.एम्.रुग्णालयात द‍ाखल केले आहे. त्याच्या पायाची हाडाचे तुकडे झाले आहेत आणि डोक्याला भरपुर मार लागल्यामुळे सध्या तो काेमात आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणुन आपण याठिकाणी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर खड्डा बुजवावा, असे मेसेजमार्फत सांगितले होते.

संबंधित पोस्ट