मुंबई काँग्रेस मुंबई महानगर पालिका नगरसेवक प्रभागांमध्ये भजनाच्या माध्यमातून जनजागरण अभियान
- by Reporter
- Nov 28, 2021
- 271 views
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप जी मुंबईतील सर्व महानगर पालिका नगरसेवक प्रभागांमध्ये जनजागरण अभियान राबवत आहेत. ब्लॉक क्रमांक १९४ चे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर धुमाळ यांनी रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी नागुसयाची वाडी (सामना प्रेस ते खेडगल्ली प्रभादेवी) येथे महागाई व बेरोजगारी विरोधी भजनाच्या माध्यमातून जनजागरण अभियानाचे आयोजन केले होते. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम सातत्याने देशवासियांना भोगायला लागत आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारी देशातील तरुणांना चुकीच्या मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त करत आहे याचे परिणाम येणाऱ्या काळात देशाला आणि देशवासियांना अधिक तीव्रतेने जाणवणार आहेत. झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ब्लॉक क्रमांक १९४ येथे करण्यात आलेल्या जनजागरण आंदोलनात राजन भोसले, प्रवीण नाईक, हेमंत दळवी, सुरेखा पाटील, चारुशीला भिलारे, गणेश कदम, अतीत मयेकर, आनंद यादव, टोनी फर्नांडीस, माहीम विभागातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर