
संत नामदेव साहित्य पुरस्कार रेखा नार्वेकर यांना जाहीर
- by Reporter
- Nov 28, 2021
- 393 views
मुंबई : हिंगोली येथील राष्ट्रीय स्तरावरील संत नामदेव ललित साहित्य पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध लेखिका रेखा नार्वेकर यांच्या साहित्य आणि जीवन उर्जा या ललित साहित्य ग्रंथास जाहीर झाला आहे. दुर्गे दुर्घट भारी, नवे किरण, शब्द आणि मन, अंतर्वाद, जागर, आनंदतरंग, अमृत कण कोवळे अशी अनेक कथा-कविता, ललित लेख, एकांकिका आणि संत साहित्यावरची पुस्तके रेखा नार्वेकर यांची प्रसिद्धझाली आहेत. अनेक पुस्तकांना मान्यवर संस्थांची पारितोषिकेही प्राप्त झाली आहे.
रिपोर्टर