अखिल भारतीय कीर्तन संस्थेचा दादर येथे पदवीदान समारंभ

मुंबई :अखिल भारतीय कीर्तन संस्था यांच्या वतीने दादर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे पदवीदान समारंभ आय़ोजित करण्यात आला.समारंभाचे अध्यक्ष ह. भ. प. मुकुंदबुवा विठ्ठलबुवा देवरस यांचे सुरूवातीला कीर्तन आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ झाला. कीर्तन काळात संस्थेच्या वतीने ऑनलाईन कीर्तन सेवा सुरुच होती. त्याचबरोबर दोन वर्षांचा अभ्यासक्रमदेखील याच दरम्यान झाला. यात महाराष्ट्रातील तसेच बाहेरच्या राज्यांतील विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते.

प्रारंभी संस्थेचे कार्यवाह किशोर साठे आणि कोषाध्यक्ष श्री. खरे यांची भाषणे झाली. संस्थेचे विश्वस्त रवींद्र आवटी हेदेखील यावेळी उपस्थित होते. मुकुंदराव देवरस यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून परमार्थ आणि कीर्तनातून विचार आणि आचऱण शुद्ध रहावे, यासाठी समाजात कार्य करण्याचे मार्गदर्शन केले. कीर्तन वर्गाचे प्राचार्य, शिक्षक, सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.



संबंधित पोस्ट