श्रीधर देवलकर यांनी डॉ.निलम निझारा यांना दिली गुरुदक्षिणा,,,,,
- by Reporter
- Nov 28, 2021
- 328 views
मुंबई : सामाजिक कार्य करताना त्या कार्यात सातत्य राखणे किती महत्वाचे असते हे प्रत्यक्षात अनुभवता आले. आज आपल्या सामाजिक जीवनात मित्र आणि मित्रत्व तसेच गुरू आणि शिष्य अशी नाती दुर्मिळ झालेली दिसतात परंतु आज आम्ही एका कार्यक्रमातून मित्र मित्रांना मरणोत्तर सन्मान देत आहे.आणि एक शिष्य आपल्या गुरूना गुरूदक्षिणा देत आहे याची प्रचिती आम्हाला आज मिळाली याचा अर्थ मित्राचीआठवण ठेवणारे मित्र आजही समाजात वावरताना दिसत आहेत तर दुसरीकडे आपणास आपल्या गुरू कडून मिळालेली शिकवण याची जाणीव ठेवणारे शिष्य आजही पृथ्वीतलावर दिसत आहेत.कामगार राज्य विमा योजना रुग्णालय कांदिवली पूर्व येथील रुग्णालयातील प्रयोगशाळा विभागातील सेवा निवृत्त प्रयोगशाळा आणि रक्तपेढी सहाय्यक तंत्रज्ञ आयोजक श्रीधर बुधाजी देवलकर यांनी आपल्या रक्तदान सहाय्य केंद्र कांदिवली पूर्व या नोंदणीकृत संस्थेचा तिसावा वर्धापन दिन साजरा करून ज्या मित्रांनी गेली ३० वर्षे सामाजिक कार्या सोबत स्वेच्छेने रक्तदान केले,त्या मित्रांना मरणोत्तर स्मृतिचिन्ह देवून त्यांना आदरांजली वाहताना मित्रत्व कसे असावे हे दाखवून दिले.
तसेच ज्या रक्तपेढी अधिकारी यांनी देवलकर यांना गेली तीस वर्षे योग्य मार्गदर्शन,सहकार्य आणि योग्य सल्ला मिळाला याची आठवण ठेवून कामगार राज्य विमा योजना रुग्णालय वरळी येथील रक्तपेढी अधिकारी आणि फेडरेशन ऑफ मुंबई ब्लड बँक सरचिटणीस डॉ. निलम निझारा यांचा श्री देवलकर यांनी स्मृतिचिन्ह देवून सन्मान केला हा शिष्याने गुरूंना दिलेली गुरूदक्षिणा पाहून हृद्यस्पर्शी क्षण अनुभवता आला.डॉ. निलम निझारा या वरळी येथील कामगार राज्य विमा योजना रुग्णालय येथे रक्तपेढी विभागप्रमुख आणि फेडरेशन ऑफ मुंबई ब्लड बँक सरचिटणीस या पदावर आजही कार्यरत असून श्री देवलकर यांना आजही त्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
श्री देवलकर यांनी ३० वर्षे शासकीय सेवा सांभाळुन रक्तपेढी करीता स्वेच्छा रक्तदान शिबिरे आयोजित करून रुग्णांना जीवनदान देण्याचा एक छोटासा प्रयत्न आणि कोविड काळात केलेल्या कार्याची दखल घेवून फेडरेशन ऑफ मुंबई ब्लड बँक सरचिटणीस डॉ. निलम निझारा यांनी श्री देवलकर यांना एक सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि अभिनंदन पत्र देऊन गौरव केला.
रिपोर्टर