वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केला मनपा कर्मचाऱ्याचा सम्मान
- by Reporter
- Nov 28, 2021
- 375 views
मुंबई : नुकत्याच हैदराबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मुंबई महानगरपालिका एन विभागाचे कर्मचारी उत्तम राघुजी जाधव यांनी ५९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले. घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सम्मान
करण्यात आला,त्यावेळी प्रकाश वाणी,दीपक गवळी,सचिन भांगे,किशोर येवले,अरुण लोखंडे, नितीन गंभीर, दिलीप भोईर,सैदल सोंडे,अंकुश खरात,दीपक पवार,गोपाळ सोनी,चंदू हळदणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

रिपोर्टर