मुंबईमध्ये शेतकरी आंदोलनातील शहिद शेतकऱ्यांची अस्थीकलश रथयात्रा
- by Reporter
- Nov 27, 2021
- 384 views
मुंबई :संयुक्त किसान मोर्चा, जनआंदोलनाची संघर्ष समिती व कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र यांच्या वतीने २७ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील शहीद शेतकरी अस्थीकलश रथयात्रा शिवाजी पार्क चैत्यभूमी येथून निघून हुतात्मा बाबू गेनू स्मारक परेल मार्गे महात्मा गांधी पुतळा, मंत्रालय येथे गेली. त्याठिकाणी या रथयात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, शेतकरी नेते जयंत पाटील, नामदेव गावडे, अजित नवले, उल्का महाजन, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, विद्याताई चव्हाण, राजा सिंग यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. शेतकरी अस्थीकलश यात्रेत कामगार नेते विवेक मोंटेरो, विश्वास उटगी, प्रकाश रेड्डी, संजय वढावकर, सुधाकर अपराज, निवृत्ती धुमाळ, मारुती विश्वासराव, मिलिंद रानडे, उदय भट, आदी मान्यवर,कामगार, कार्यकर्ते आदिवासी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रिपोर्टर