महापालिका बी प्रभागातील अधिकाऱ्याची रात्री अंधारात मसजिद बंदरात फेरीवाल्यांकडून हफ्ते वसुली
महापालिका बी विभागात खालपासून वरपर्यंत भष्ट्राचार
- by Reporter
- Nov 25, 2021
- 709 views
मुंबई : मुंबईच्या रस्त्यावर जागोजागी पथारी पसरून बसलेले फेरीवाले हे कायमची डोकेदुखी होऊन बसली आहे मात्र संबधित अधिकाऱ्यांच्या वरदहस्ता शिवाय हे फेरिवाले वाढणे शक्य नाही.फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात मलिदा हा अगदी 'वर' पर्यत पोहोचवला जातो. याच्या सुरस कथा आपण नेहमीच ऐकत असतो हफ्तेबाजीची कामे नेहमी दलालांमार्फत केली जातात मात्र एखादा अधिकारीच जर हफ्तेखोरीसाठी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उतरला दि,२४ बुधवार रात्री महापालिका बी प्रभागातील मस्जिद बंदर येथील युसूफ मेहर अली मार्गावर रात्रीच्या अंधारात फेरीवाल्यांकडून हफ्ता वसुली करत एक पालिका अधिकारी फिरत होता.यावेळी संबधित अधिकारी व फेरीवाल्यांच्या गाड्या उचलणाऱ्या गाडीचा चालक दोघे सॅम्युएल स्ट्रीटवरील फळभाजी विक्रेत्यांकडून हफ्ते वसूल करत होते यावेळी सॅम्युएल स्ट्रीट वरील अजगर नावाचा फेरीवाला सर्व फळभाजी विक्रेत्यांकडून हफ्ता गोळा करून अधिकाऱ्यांकडे जमा करत होता. अशा वसुलीबाज व भ्रष्ट्र अधिकारी व सोबत असलेल्या हप्तेबाज कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी येथील संतप्त रहिवाशी व व्यापारी वर्ग करू लागला आहे.
रिपोर्टर