
चिपळूण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व एक लाख रुपये आर्थिक मदत
- by Reporter
- Oct 28, 2021
- 364 views
मुंबई : चिपळूण, महाड, कोकण, परीसरात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरामुळे जुलै २०२१ मध्ये अनेक कुटुंबांचे संसार वाहुन गेले. मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आस्थापनेतील कर्मचारी व अधिकारी यांना आपल्या पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याकरीता सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. बहुसंख्य कर्मचारी व अधिकारी यांनी भरघोस प्रतिसाद देत सामाजिक कर्तव्य भावनेपोटी केलेल्या आर्थिक मदतीमधुन पिडीत पूरग्रस्त बांधवांना मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक व संसारपयोगी वस्तूंचा साठा पाठविण्यात आल्यानंतरही, अनेकांनी आर्थिक मदतीचा ओघ पुढेही सुरूच ठेवला. मर्यादित कालावधीनंतरही करण्यात आलेल्या उर्वरित आर्थिक मदतीचा एक लाख रुपये रकमेचा धनादेश १८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस, खासदार श्री अनिल देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट संदर्भातील अनेक विषयावर माननीय खासदारांकडे चर्चा करण्यात आली.
धनादेश सुपूर्द करताना मुंपोट्र स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, कार्याध्यक्ष नंदू राणे, संजय माधव, कोषाध्यक्ष प्रमोद दळवी, महासंघाचे पदाधिकारी वामनराव भोसले, दिनेश बोभाटे, उमेश नाईक, उल्हास बिले, हेमंत सावंत उपस्थित होते.
मुंपोट्र स्थानीय लोकाधिकार समितीच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद देणार-या सर्व दानशूर मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी व अधिकारी वर्गाचे स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद देण्यात आले.
रिपोर्टर