घाटकोपरच्या वर्षांनगर , रामनगर , भीमनगर , कातोडीपाड्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार

विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यानी घेतली महापौरांची भेट

घाटकोपर( निलेश मोरे) घाटकोपर पश्चिमे कडील वर्षांनगर , रामनगर , भीमनगर आणि कातोडी पाड्यातील पाण्याची गेली अनेक वर्षे मोठी समस्या येथील नागरिकांना उदभवत आहे. डोंगराळ भागावर या झोपड्या वसवल्या असल्याने चार पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. तीस वर्षे उलटूनही या टाक्यांचे नियोजन व्यवस्थित नसल्याने त्या जीर्ण अवस्थेत आहेत. डोंगर भागातील अनेक कुटुंबे या टाक्यांतून पाणी भरत आहेत. या टाक्यांचे नियोजन महानगर पालिकेने करावे व टाक्यांतील जीर्ण झालेले पंप बदलावे तसेच वीस ते पन्नास जणांसाठी स्वतंत्र मीटर बदलावे आणि थकबाकी सहित चालू बिल महापालिकेनेच वसूल करावे व प्रत्येक कुटुंबाला योग्य तीच थकबाकी आकारावी अशा अनेक मुद्यांवर आज शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.या बैठकीला रत्नागिरी संपर्क प्रमुख सुधीर मोरे , स्नेहल मोरे , नगरसेवक सुरेश पाटील व चारही टाक्यांचे कमिटी अध्यक्ष व संबंधित महापालिका अधिकारी  अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासु , अजय राठोर आदी उपस्थित होते. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून महिनाभरात नागरिकांना दिलासा मिळेल असे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

संबंधित पोस्ट