उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूकीचे वाजले पडघम
एक सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार.
- by Rameshwar Gawai
- Aug 26, 2021
- 1186 views
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असुन राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीच वार्ड रचना असणार असल्याचे काल जाहीर केले आहे . तसे आदेश सुध्दा महापालिकांच्या आयुक्तांना दिले आहेत हा आदेश राज्य निवडणुक आयोगाने बुधवारी जाहीर केला आहे .
उल्हासनगर महापालिकेचा कार्यकाल हा फेबृवारी २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे . तेव्हा राज्य निवडणुक आयोगाने ही निवडणुक घेण्याचे निश्चित केले आहे . त्या करिता राज्य निवडणुक आयोगाने नवीन वार्ड रचनेसाठी नियमावली जाहीर केली आहे दरम्यान या नियमावलीत महापालिकेने वार्ड रचनेचा प्रारुप आणि कच्चा आराखडा तयार करण्याबाबत सूचविण्यात आले आहे. सन २०११ ची जनगणना विचारात घेऊन मतदारसंख्या निश्चित केली जाणार असुन अद्यावत मतदार याद्याही तयार करण्याबाबत सूचविले आहे. प्रभागाच्या प्रारुप रचनेचे काम २७ ऑगस्टपासून हाती घेण्यात येणार असुन ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, असे ही निवडणुक आयोगाने आदेशात म्हटले आहे. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम यथावकाश निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाणार आहे .
सर्व परिस्थिती लक्षात घेता प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुक मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे यासाठी सध्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. सदर कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही २७ ऑगस्ट, २०२१ पासून सुरू करण्यात यावी.असे निवडणुक आयोगाने जाहीर केले आहे . या निवडणुकीची घोषणा होताच उल्हासनगर मध्ये राजकिय रंग चढला आहे . एक सदस्यीय वार्ड रचना असल्याने ही निवडणुक चुरशीची होणार आहे . तर ज्यानी कोविड काळात गोर गरीबाना सर्व परिने मदत केली तेच या निवडणुकी बाजी मारतील . जे कोविड काळात घरात बसुन होते त्यानी कोणालाच मदत केली नाही अशानी या निवडणुकीत उभेच राहु नये कारण मतदार त्याना यावेळी धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत . कोविड काळात बिळात लपलेले आणि निवडणुक जाहीर होताच बिळातुन बाहेर पडलेल्याना मतदार नक्कीच झिडकारणार आहेत . तसेच पाच वर्षात काही ही काम न करता निवडणुकीचे पडघम वाजताच प्रभागात फिरताना दिसत आहेत .
उल्हासनगर महापालिकेचा कार्यकाल हा फेबृवारी २०२२ मध्ये संपणार आहे . तेव्हा आता सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले आहेत . २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना २५ . भाजपा व टिओके मिळुन ३३ . साई पक्ष १२ . एन सी पी ४ . आर पी आय ३ . कॉंग्रेस १ . पी आर पी १ . तर भारिप १ . हे या राजकिय पक्षांचे नगरसेवक निवडुन आले होते . आता एक सदस्यीय वार्ड रचना झाल्याने यातील कोविड मध्ये काम करणारेच नगरसेवक निवडुन येतील असे वाटते .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम