कल्याण-मलंगगड रोडवरील धक्कादायक घटना वॉचमनवर प्राणघातक हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद
पोलिस अज्ञात आरोपींच्या शोधात
- by Reporter
- Aug 26, 2021
- 1206 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) कल्याण पूर्वेतील मलंगरोडवरील असलेल्या एका गॅरेजबाहेर झोपलेल्या वॉचमनवर अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. निलेश घोष (25) असे वॉचमनचे नाव असून त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे.
कल्याण-मलंग रोडवरील एसार पेट्रोल पंप समोरील एका गॅरेजच्या बाहेर वॉचमन निलेश हा एका लाकड्याचा बाकावर रात्री झोपला होता. त्यावेळी 3 ते 4 अज्ञात जणांनी एकत्र जमून निलेशच्या डोक्यावर आणि पायावर जीवघेणा हल्ला करून तेथून पळून गेले. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. जखमी निलेशवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने निलेशला मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान हा हल्ला आर्थिक, कौटुंबिक वा पूर्ववैमनस्यातून अशा कोणत्या कारणावरून झाला याचा तपास सुरू असल्याचे मानपाडा पोलीसांनी सांगितले.

रिपोर्टर