१५ ऑगस्ट पासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा
- by Adarsh Maharashtra
- Aug 08, 2021
- 830 views
मुंबई: अखेर मुंबईकरांना देव पावला आणि त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची सुबुद्धी दिली त्यानुसार १५ ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह वरून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधणार असे जाहीर होताच उद्धव ठाकरे काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते त्यानुसार काल त्यांनी रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना कोरोना अजून गेलेला नाही त्यामुळे सरकार सावधगिरीने पावले उचलत आहे. लोकांनीही सावधगिरी बाळगायला हवी. टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार प्रत्येक गोष्टीत हळूहळू शिथिलता दिली जात आहे या काळात हॉटेल असोसिएशनचे लोक येऊन भेटले त्यांनी वेळ वाढवून मागितली त्यांनाही मी काही गोष्टी समजावून सांगितल्या त्या त्यांनी ऐकल्या. आता दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन अजून आठ दिवस काही गोष्टी शिथिल करण्यासाठी थांबावे लागेल. राहता राहिला सवाल लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली करण्याचा तर ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस झाले आहेत अशा लोकांना १५ ऑगस्ट पासून लोकल प्रवासाची परवानगी असेल त्यासाठी ऑफ आणि ऑनलाईन दोन डोसचे प्रमाणपत्र दाखवून पास किंवा तिकीट मिळवता येईल असे त्यांनी सांगितले त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. उद्धव ठाकरे यांनी सुरवातीला अतिवृष्टीने संकट आणि त्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम