एसव्हीसी बँक आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कोविड - १९ लसीकरणाचा खर्च उचलणार

११ राज्यांतील २५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा

मुंबई : एसव्हीसी को- ऑपरेटिव्ह बँक लि. (एसव्हीसी बँक) यांनी आज जाहीर केले की, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कोविड - १९ लसीकरणाचा खर्च बँक उचलणार आहे. बँकेच्या या कृतज्ञता पूर्वक निर्णयाचा लाभ देशातील ११ राज्यांतील २५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना घेता येईल.

या उपक्रमाविषयी बोलताना एसव्हीसी बँकेचे चेअरमन श्री दुर्गेश एस. चंदावरकर म्हणाले, “लोक-केंद्रित संस्था असल्याने आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य देण्यावर विश्वास ठेवतो. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीच्या काळात आमच्या कर्मचाऱ्यांकडून हिंमत व धैर्याचे एक अद्वितीय प्रदर्शन पहायला मिळाले, त्यांनी मोठ्या हिंमतीने आमच्या आदरणीय ग्राहकांची सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे. त्यांच्या या सेवेची जाणीव ठेवून, त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करून, एसव्हीसी बँकेत आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाच्या दोन अनिवार्य डोसचा खर्च उचलण्याचे ठरविले आहे. आमचे कर्मचारी चालू असलेल्या साथीच्या आजारा विरूद्ध लढा सुरू ठेवत आहेत; त्यांना सुरक्षित, निरोगी आणि सुसज्ज ठेवण्यासाठी तसेच सरकारचे ' कोव्हिड-१९ मुक्त भारत ' हे ध्येय पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

या क्षणी बँकेने सर्व भारतीयांना आवाहन केले आहे की कोविड -१९ विरूद्ध लढा कायम ठेवण्यासाठी लसीकरण, स्वच्छताविषयक पद्धती व सामाजिक अंतर यांचे पालन करावे.

देश कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेशी झुंजत असताना व देशातील बहुतांश भाग हा लॉकडाऊनला सामोरा जात असताना बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी वर्ग मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेची कोंडी होऊ नये यासाठी शांतपणे एक गंभीर भूमिका बजावत आहेत. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी हे बँकर्स त्यांच्या घरातून किंवा बँकेच्या शाखेतून अविरत काम करत आहेत.

एसव्हीसी बँक, ही एक अग्रगण्य बहु-राज्य सहकारी बँक असून, बँकेने ग्राहकांच्या बँकिंग आणि आर्थिक गरजा घरबसल्या सुरक्षितपणे पूर्ण करता याव्यात यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक सुविधा सादर केल्या आहेत. बँकेतर्फे ऑनलाईन एफडी बुकिंग, नेटबँकिंगला ऑनलाईन नोंदणी, अकाऊंट बॅलन्स तपासणीसाठी मिस कॉल सुविधा, 15 G/H फॉर्म ऑनलाईन सबमिट करणे आणि इतरही अनेक उपक्रम सुरू केले गेले आहेत जेणेकरुन कोरोना महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. त्याशिवाय बँकेने आपल्या सर्व शाखा व कार्यालयेदेखील कार्यान्वित ठेवले आहेत ज्यामुळे बँकेचे दैनंदिन कामकाज अखंडितपणे सुरु राहील आणि ग्राहकांना सदैव सर्वोत्तम सेवा प्रदान करता येईल.

संबंधित पोस्ट