लव घाटकोपर सेल्फी पॉईंटची दुसऱ्यांदा दुरावस्था,डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती नव्याने दुरुस्ती

घाटकोपर (निलेश मोरे) पूर्वेकडील उपाश्रय लेन मार्गावर असलेल्या लव घाटकोपर सेल्फी पॉईंटची दुसऱ्यांदा दुरावस्था झाल्याने सेल्फीप्रेमींनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त केली आहे.  सध्या युवकांमध्ये सेल्फीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात असून त्याच पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी नगरसेवक असताना पूर्व मध्ये लव घाटकोपर या सेल्फी पॉईंटची निर्मिती करून हिंदी सिनेअभिनेत्री विद्या बालन हिच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उदघाटन केले होते. उदघाटनाच्या काही महिन्यानंतर या सेल्फी पॉईंटची अवस्था खराब झाल्याचे वृत्त डिसेंबर 2019 मध्ये प्रसारित झाल्यानंतर प्रभाग 131 च्या नगरसेविका राखी जाधव यांनी नगरसेवक निधीचा वापर करत या सेल्फी पॉईंटची नव्याने दुरीस्ती करण्यात आली होती. एक वर्षा नंतर दुसऱ्यांदा या लव घाटकोपर सेल्फी पॉईंटची दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे सदर लव घाटकोपर सेल्फी पॉईंट हे एन वार्ड महानगर पालिकेच्या हाकेच्या काही अंतरावर आहे. नुकतेच नव्याने दुरुस्ती केलेल्या सेल्फी पॉईंटची अवस्था पुन्हा खराब कशी झाली की या कामातच थुकपट्टी लावण्यात आली आहे का असा सवाल सेल्फीप्रेमीं करत आहेत. 

प्रतिक्रिया , 

अभिषेक सावंत : सेल्फी पॉईंटमुळे परिसराची सुंदरता वाढते. मात्र वारंवार ते खराब होत असल्याने येथे सेल्फी काढताना सुद्धा लाज वाटते. किंबहुना सेल्फी घेताना आपलाच परिसर आपल्या डोळ्यांना खराब असल्याचे निदर्शनात येते. पुन्हा त्याची दुरुस्ती करून ते टिकेल कसे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

संबंधित पोस्ट