
अवैद्यरित्या हरणांचे शिंग तस्करी करणारया तरुणाला सापळा रचून ठाणे उपवन संरक्षक विभागाने केली अटक!
- by Reporter
- Feb 24, 2021
- 1507 views
मुंबई (जीवन तांबे)अवैद्य रित्या हरणांचे शिंग तस्करी करणारया तरुणाला सापळा रचून ठाणे उपवन संरक्षक विभागाने आज अटक केली आहे.मोहम्मद सिराज मोहम्मद ताज शेख - वय 46 असे या आरोपीचे नांव आहे.
कुर्ला पश्चिम परिसरातील सीएसटी मार्गा वरील फितवाल कंपॉइंट मध्ये रहाणारा हा आरोपीने चितळ या प्रजाती हरणांचे शिंग अवैद्य मार्गाने तस्करी करून आणले असल्याची माहिती उपवन संरक्षक वन्यजीव ठाणे अधिकारी भानुदास पिंगळे, सहा. वनसंरक्षक वन्यजीव फणसाड अधिकारी, नंदकिशोर कुपते यांना मिळाली असता ते तसेच क्षेत्रिय उपनिदेशक पश्चिम श्रेत्र वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो, बेलापूर, नवि मुंबई यांच्या मार्गदर्शनुसार नवी मुंबईचे अधिकारी व कर्मचारी यांनी संसार हॉटेल, बस क्रमांक 313च्या पाठीमागे आरोपी येणार म्हणून सापळा रचून आरोपीला अटक आज ताब्यात घेतले आहे.
त्याच्या कडून एक हरणांचे शिंग हस्तगत केले.आरोपीला कुर्ला न्यायालयात हजर केले असता त्याच्यावर वन्यजीव गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रिपोर्टर