म.रा.मराठी पत्रकार संघाची तालूका कार्यकारिणी गठित

तालुकाध्यक्षपदी वेंदात मेहरकुळे तर उपाध्यक्षपदी सुनिल संकुलवार यांची निवड

गोंडपीपरी (प्रतिनिधी)-तालुक्यातील स्थानिक संदीप हॉटेल येथे पार पडलेल्या  बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा गोंडपिपरी ची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर सुनील  बोकडे यांच्या आदेशानुसार येथील संदीप हॉटेल येथे सदर बैठक घेण्यात आली. आयोजित बैठकीस ज्येष्ठ पत्रकार सुनील डोंगरे यांचे अध्यक्षते खाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यादरम्यान गोंडपीपरी तालुका कार्यकारिणीची घोषणा करताना तालुकाध्यक्ष पदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी वेदांत मेहरकुळे यांची सर्वानुमते तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष म्हणून पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी सुनील संकुलवार, सचिव पदी शेखर बोंगिरवार, कार्याध्यक्षपदी कुणाल गायकवाड, संघटक म्हणून नागेश ईटेकर, कोषाध्यक्षपदी अमित उईके, तर सदस्य म्हणून प्रमोद दुर्गे , चेतन मांदाडे , शरद कुकूडकर यांची निवड करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ध्येयधोरण व विविध विषयांवर चर्चा करून आगामी कार्यक्रमाच्या प्रयोजना बाबत नियोजन करण्यात आले.संघाची तालुका कार्यकारणी गठित झाल्याबद्दल पदाधिकार्‍यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

संबंधित पोस्ट