भवानी नडगांव अ संघ भेलोशी चषकांचे प्रथम मानकरी .. उपविजेता जन्नीदेवी क्रिकेट संघ जुई ..
भेलोशी ग्रामीण भागात प्रथमच रंगला भव्यदिव्य ओव्हआर्म क्रिकेट स्पर्धेचा थरार ..या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद ..
- by Reporter
- Feb 24, 2021
- 2307 views
मुंबई(सुजित धाडवे) महाड तालुक्यातील भेलोशी ग्रामस्थ मुंबई मंडळ सांस्कृतिक, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळाकडून संलग्न सोमजाई क्रिकेट क्लब भेलोशी यांच्या विद्यमानाने भेलोशी चषक २०२१ चे भेलोशी येथील कै.बाळूदादा गोसावी क्रिडानगरीत एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेला अनेक क्रिकेट संघासह मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या.एकसंघतेची भावना टिकून राहावी, माणुसकीची भिंत उभी राहावी यासाठी स्पर्धेचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी ग्रामस्थांना व मुंबईकरांना सहकार्य केले अशा दानशूरांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मारुती रेवाळे, इनायतखान देशमुख, सोमनाथ ओझर्डे,परमेश्वर तिकडे, देवदास पवार, किरण बिरवाडकर, महेश सुकूम, जनार्दन राणे, समीर रेवाळे, रमेश राणे ,नारायण गोडांबे यांचा " कोरोना योद्धा " म्हणून सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र मूर्तीस पुष्पहार अपर्ण करून, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ भागवत यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्धघाटन करण्यात आले.यादरम्यान रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे गांव सोमजाई मातेच्या कृपेने भेलोशी गावचे नाव या कार्यकारी मंडळाच्या अनोख्या संकल्पेतून गावाची थोरवी या स्व-रचित गाण्याद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी भेलोशी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच वर्षा पवार,दादा महाराज राणे, तुकाराम गोडांबे, नारायण गोडांबे, यादव गुरुजी, मुंबई मंडळ अध्यक्ष संतोष धारशे, माजी अध्यक्ष सत्यवान यादव,दगडू रेवाळे, आत्माराम शेंडल, कुणबी युवाध्यक्ष समीर रेवाळे,भेलोशी पं. मा. वि.भेलोशी मुख्यध्यापक आर.ई. बनसोडे, शिक्षक एस.आर. जाधव, मुंबई येथील पदाधिकारी सदस्य खाडीपट्टा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील त्यासाठी अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजेत असे विचार पत्रकार रघुनाथ भागवत यांनी भेलोशी मुंबई ग्रामस्थ मंडळाने आयोजित भेलोशी चषक २०२१ उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.राजेश मर्चंडे, जितेंद्र साळवी, संतोष पवार, सुधीर पवार, विलास निंबरे, विशाल कदम,विशाल चव्हाण,माजी सैनिक प्रमोद भावे,कृष्णा सुकुम, राजेश सुकूम, दिपक महाडिक, इब्राहिमशेठ झमाणे, नितीन चिले, महम्मद पोवेकर, तय्यबभाई पोवेकर, प्रभाकर बिरवाडकर, एकनाथ सुकूम ,अश्विनी ताई घरटकर, शितल विचारे, गजानन कदम, आरती निर्मल आदीं अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेच्या दरम्यान सदिच्छा भेट दिल्या. यावेळी आयोजकांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच देणगीदार, सहकार्य करणाऱ्या सर्वांचे देखील आभार मानून सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
महाड खाडीपट्टा विभागात क्रिकेटच्या स्पर्धेत प्रथमच आयोजकांच्या माध्यमातून अल्पोपहाराची व्यवस्था स्थानिक करण्यात आली होती. सहभागी संघांमधील मधील १५ खेळाडूंना आणि असोसिएशन चे पदाधिकारी यांना भोजनाची व्यवस्था दुपारी भेलोशी मुंबई मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या ९०० पेक्षा अधिक खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनी जेवणाचा आस्वाद घेतला,त्याचबरोबर क्रिकेट खेळतांना खेळाडूंना दुःखापत झाल्यास त्वरित तेथे प्रथम उपचार करण्यासाठी डॉ.राजेश मर्चंडे यांनी जबाबदारी घेऊन सहकार्य केले, अशा भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेचे त्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक मान्यवरांसह क्रिकेट प्रेमींनी क्रिकेटच्या मैदानात व्यक्त करून भेलोशी ग्रामस्थ मुंबई मंडळाला पुढील वाटचालीस शुभेच्छा सोशल माध्यमातून दिल्या जात आहेत..
खाडीपट्टा टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदणीकृत झालेल्या २४ नामवंत संघांनी क्रिकेट स्पर्धेला सहभाग नोंदविला होता यामध्ये विजेता संघ भवानी नडगांव अ, उपविजेता जन्नीदेवी क्रिकेट संघ जुई, तृतीय क्रमांक जगदंब खुटिल रामवाडी यांनी भेलोशी २०२१ या चषकावर नाव कोरले, तसेच जगदंबा खुटील रामवाडी संघाचा नितेश सुकूम यांनी उत्कृष्ट फलंदाज लंअदाज रुपेश दवंडे यांनी किताब पटकावला तर सामनावीर जुई संघाचा विनय आग्रे यांनी यांनी किताब पटकावला, सदर स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रक्कम रूपये बावीस हजार व आकर्षक चषक, उपविजेत्या संघास रोख रक्कम रूपये बारा हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक प्राप्त संघाला रोख रक्कम रूपये पाच हजार व आकर्षक चषक तसेच सामन्यांमध्ये मालिकावीर, फलंदाज व गोलंदाज यांना आकर्षक चषक त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्या खेळाचा म्हणून अंतिम फेरीत विजेता उपविजेता , तृतीय क्रमांक पटकावला अशा कामगिरीबद्दल त्यांच्या खेळाचा गौरव म्हणून आकर्षक पदक देऊन तसेच सहभागी झालेल्या २४ क्रिकेट संघाना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले,समाविष्ट खेळाडूंनी तसेच प्रथम तीन क्रमांक पटकविलेल्या संघ नायकांनी आयोजक भेलोशी मुंबई मंडळाचे विशेष आभार मानून खाडीपट्टयातील शिस्तप्रिय आणि सर्वात मोठी स्पर्धा म्हणून नावलौकिक मिळविल्याचे प्रतिक्रिया देताना जाहीर केले, हे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आवर्जून उपस्थित होते, या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचे सुत्रसंचलन जयेश यादव व सखाराम रेवाळे प्रस्ताविक अध्यक्ष संतोष धारशे यांनी केले तर आभार समीर रेवाळे यांनी केले. संपूर्ण सामन्याचे सुंदर असे समालोचन क्षीरसागर यांनी करून खेळाडू ना प्रोत्साहित केले तर स्पर्धास्वरूपी कार्यक्रम यशस्वीपणे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नियोजनमध्ये स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संतोष धारशे, उपाध्यक्ष हिराचंद पिचुर्ले, सरचिटणीस जयेश यादव, चिटणीस सखाराम रेवाळे, खजिनदार संदेश रेवाळे उपखजिनदार राजेश गोडांबे, हिशोब तपासणीस सुरेंद्र गोडांबे, मंगेश निर्मळ,सल्लागार सत्यवान यादव,समिर रेवाळे,आत्माराम शेंडळ, दगडू रेवाळे, विजय गोडांबे, भाऊ यादव, संदीप रेवाळे,सत्यवान गोडांबे, मनोज गोडांबे, पांडुरंग शिगवण, राजेंद्र निंबरे, नितेश पिचुर्ले, रमेश यादव , संकेत यादव, नितेश शेंडळ, जितेंद्र रेवाळे, निलेश राणे, श्रीरंग रहाटवळ,आदी भेेलोशी ग्रामस्थ मुंबई मंडळ महिला मंडळ यांनी क्रिकेट मैदान करण्याकरता महत्व पूर्वक योगदान ठरलं होतं त्याच बरोबर स्पर्धेसाठी संपूर्ण सोमजाई क्रिकेट क्लब युवा कार्यकर्ते शालेय शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थी यांनी प्रचंड मेहनतीने स्पर्धा यशस्वी केले..

रिपोर्टर