घाटकोपर मध्ये पाच फुटी नागाने उडवली रहिवाशांची झोप

घाटकोपर :( निलेश मोरे) मुंबई मध्ये रहिवासी वस्तीत दिवसेंदिवस वन्य प्राणी आणि सर्प येण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान घाटकोपर च्या भटवाडी विभागात कॉलनी परिसरात एक भला मोठा नाग फिरत असल्याने स्थानिकांची तारांबळ उडाली होती. भटवाडी चा कॉलनी परिसर हा खंडोबा टेकडीला लागून आहे.

मात्र आता या टेकडी मध्ये खोदकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात सर्प रहिवासी वस्तीकडे वळत आहेत.अश्याच प्रकारे एक भला मोठा नाग सोमवारी रात्री या रहिवासी वस्तीत स्थानिकांना आढळला. घाबरलेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेविका अश्विनी हांडे यांना संपर्क करून याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ सर्प मित्र महेश इतापे यांना बोलवले. त्यांनी दीड ते दोन तास शोध घेऊन अखेर त्या नागाला पकडले. त्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. हा नाग तब्बल पाच फूट लांब होता, सध्या त्याला सर्प मित्रांनी त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडले आहे. गेल्या काही दिवसात खंडोबा टेकडी परिसरात सुरू असलेल्या उत्खनन मुळे या टेकडी च्या आजू बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सर्प आढळू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

संबंधित पोस्ट