
शिवसेना उपनेते, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन !
- by Reporter
- Feb 22, 2021
- 1075 views
मुंबई (जीवन तांबे) ठाण्याचे शिवसेना उपनेते, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे याचे आज संध्याकाळी पाच सुमारास उपचार दरम्यान निधन झाले आहे.
ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे आज दुपारी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तरे हे 66 वर्षांचा होते.
मेंदूत रक्तस्राव झाल्यानंतर अनंत तरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दोन महिन्यापासून उपचार सुरू होते. त्याचा कोरोना चाचणी अहवालही सकारात्मक होता. त्यामुळे तब्येत अधिकच खालावली. मंगळवारी दुपारी दोन वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रिपोर्टर