
भीम आर्मीचे भीमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली गुरुद्वाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संवैधानिक न्यायाधिकार मूक आंदोलन.
- by Reporter
- Feb 22, 2021
- 1219 views
मुंबई(प्रतिनिधी) आज उल्हासनगर नंबर ५ च्या वीर तानाजी नगरमधील गुरू नानक कॉलनी गुरुद्वाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राज्यप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांच्या आदेशानुसार आणि ठाणे जिल्हाप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार "संवैधानिक न्यायाधिकार मूक आंदोलन" छेडण्यात आले. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे तीन सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.ह्या हल्ल्यात दोन बहिणीचा जागीच मृत्यू होऊन , एक मुलगी अत्यंत जखमी अवस्थेत असून , तिची प्रकृती गंभीर असून , तिला एम्स सारख्या दवाखान्यात हलवून तिच्यावर योग्य उपचार करून , तिचे प्राण वाचवावे असे भीम आर्मीचे संस्थापक प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद यांनी मागणी केली असतानाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयसिंग बिष्ट उर्फ आदित्यनाथ योगी यांचे सरकार ढिम्म असून , उत्तर प्रदेशात आमच्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत. तसेच हरियाणा मध्ये सुद्धा नवनीत कौर ह्या २३ वर्षीय भगिनीला कर्नाल जिल्हा जेल मध्ये ठेवण्यात आले असून , भाई चंद्रशेखर आझाद यांना आपल्या ह्या बहिणीला भेटण्यास मनाई करण्यात आली असून, ह्या देशात सातत्याने आमच्या गोरगरिबांच्या लेकीबाळीवर अत्याचार सुरू असून , बेटी बचाव-बेटी पढाव म्हणणारे केंद्र सरकार ह्या लेकीबाळींना संरक्षण देण्यात पूर्णतः अपयशी ठरले असून , भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे साहेबांच्या आदेशानुसार,ठाणे जिल्हाप्रमुख व महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली , उल्हासनगर शहर कमिटीच्या वतीने रविवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता गुरू नानक कॉलनी गुरुद्वारा समोर हाताला , दंडाला काळ्या रिबिनी बांधून , काळे कपडे परिधान करून "संवैधानिक न्यायाधिकार मूक आंदोलन" करण्यात आले.
सदरहू आंदोलनात कोरोना संबंधीचे सर्व सरकारी नियम पाळीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.ह्यात प्रामुख्याने उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी , कर्जत तालुकाप्रमुख शिवकन्या नम्रताताई ताम्हाणे, मुंबई प्रदेश मुख्य संघटक मा.किसनभाई ओव्हाळ, शहर महासचिव मा.किशोरभाई चौहान, शहरसचिव मा.हरजितसिंग लबाना ठाणे जिल्हा महासचिव मा.ज्योतीताई भोसले , शहर उपाध्यक्ष मा.रंजिताताई बाविस्कर जिल्हासचिव मा.प्रितेशजी पवार, चांदीवली विधानसभा प्रमुख मा.तुळशीदास कटके शहर कार्याध्यक्ष मा.नानासाहेब वानखेडे , सुप्रसिद्ध समाजसेवक मा.नंदुभाई काळुंके , परी ताम्हाणे , मोहनसिंग लबाना , चरणसिंग लबाना , मा.दर्शनसिंग लबाना , साधुसिंग लबाना , हिरासिंग लबाना आणि सुरेंद्रसिंग लबाना इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या आंदोलनाला आशिर्वाद देण्यासाठी गुरुद्वाराचे मुखी बलबीरसिंग लबाना , मुखी अशोकसिंग लबाना आणि प्रधान साहेब दिलीपसिंग लबाना खास उपस्थित होते अशी माहिती कुमारभाई पंजवाणी यांनी दिली.आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्रिरत्न बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष मा.गौतमजी देशपांडे , अजय आरख इत्यादी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते, बुद्धविहारात झालेल्या छोटेखानी समारंभात बुद्ध समितीने भीम आर्मीच्या नेत्यांचा सत्कार केला , ह्यानिमित्त भीम आर्मी उल्हासनगर शाखेच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची एक प्रत भेट देण्यात आली.
रिपोर्टर