एसपीआरजे कन्या शाळेत बालहक्क सुरक्षा समितीची स्थापना

घाटकोपर (निलेश मोरे)अल्पवयीन मुलांचे होणारे शोषण व अत्याचार मुलांना बालहक्क सुरक्षेच्या माध्यमातून माहीत व्हावे यासाठी घाटकोपरच्या श्री पंडित रत्नचंद्रजी जैन कन्या शाळेत 12 फेब्रुवारी 2021 पासून बालहक्काचे जतन करण्यासाठी बालहक्क सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे .लहान मुलांनाही जगण्याचा , मनसोक्त खेळण्याचा , आराम करण्याचा अधिकार आहे. बालकांसाठी शासनाने कायद्याची तरतूद जरी केलेली असली तरी समाजात आजही काही बालकांचे शोषण केले जात आहे. असे शोषण का केले जातात याची माहिती असावी यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा बेन ठक्कर यांच्या सूचनेनुसार बालहक्क सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. श्री पंडित रत्नचंद्रजी जैन कन्या शाळा ही मुलींची शाळा असून मुली व त्यांच्या पालकांना बाल सुरक्षा कायदा व त्याची जाणीव या संदर्भात मुख्याध्यापिका नंदाबेन ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली बालसभा घेण्यात आली. या सभेत नंदा ठक्कर यांनी बालहक्क व त्याची सुरक्षा यावर एक तास मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एज्युकेशन काऊंट यावर आधारित मुलींना लघुपट दाखवण्यात आला. चाईल्ड राईड्स वर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म शाळेच्या शिक्षिका अनुजा कदम यांनी सादर केली. संगीता वाघ यांनी बालहक्क यावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

संबंधित पोस्ट