सुलभाताई लोंढे-जोशींच्या सहकार्याने सैनिक कल्याण निधी सोहळा सैनिकांच्या कार्याची जाणीव नव्या पिढीत रुजवणे गरजेचे - सुमेधा चितडे
- by Adarsh Maharashtra
- Feb 22, 2021
- 441 views
मुंबई :आपण देशासाठी काय करू शकतो, हा विचार मनात आल्यानंतर साहजिकच जवानांचे स्मरण होते, आज जिवंत आहोत उद्या काय परिस्थिती आहे, हे त्यांना ठावूक नसते, त्यांच्या आयुष्यात कधीही रिटेक नसतो, त्याचबरोबर आपल्या आप्त-स्वकियांपासून दूरवर ते केवळ आपल्यासाठी कर्तव्य बजावत असतात, त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्येक भारतीयांमध्ये असायलाच हवी, विशेषतः नव्या पिढीत ती अधिक रुजवणे गरजेचे आहे, असे विचार जवानांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यासाठी कार्य करणा-या `सिर्फ' (एसआयआरएफ - सोल्जर्स इंडिपेन्डेन्ट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन) च्या संचालिका सुमेधा योगेश चितडे यांनी व्यक्त केले.
प्रख्यात शिक्षिका (निवृत्त) सौ. सुलभाताई अनंत लोंढे-जोशी आणि श्री.अनंत केशव लोंढे यांच्या पुढाकाराने रामचंद्र प्रतिष्ठान या संस्थेने सैनिकी कल्याण निधी अर्पण सोहळा `सिर्फ' या संस्थेसाठी आयोजित केला. हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या शिवाजी पार्क येथील मादाम कामा सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे, पेणच्या नगरसेविका तेजस्विनी नेने, समाजसेविका रिमा सावंत आणि शैला साठे तसेच रामचंद्र प्रतिष्ठान संस्थापक विश्वस्त नयना शिंदे आदीं मान्यवर यावेळी उपस्थित होते.
क्रांतिकार्यात ज्यानी आपले सर्वस्व दिले, त्यांची माहिती शालेय अभ्यासक्रमात प्रकर्षाने आली पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवनातील थोडेफार कार्य किंवा समर्पण हे देशासाठी लढणा-या सैनिकांसाठी केले पाहिजे, असे विचार सुलभाताई लोंढे यांनी व्यक्त केले. स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांंचे सैनिकीकरण तसेच राष्ट्रभक्तीचे विचार समजून त्यानुसार आपला अधिक वेळ देशभक्तीसाठी द्यावा, असे आवाहन केले. नगरसेविका तेजस्विनी नेने यांचेही समयोचित भाषण झाले. याचवेळी त्यांनी पर्यावरणाबाबतचा संदेशदेखील दिला. रिमा सावंत यांनी युवकांनी नैराश्याने आत्महत्येचा मार्ग न अवलंबिता देशासाठी बलिदान करण्यासाठी स्वतःचा सिद्ध करावे, असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिमा सावंत यांनीच केले. आभार रामचंद्र प्रतिष्ठानच्या संचालिका नयना शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विविध वयोगटातील मंडळी उपस्थित होती.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम