मुलुंड पोलीस वसाहतीतील नागरिकांच्या घरासाठी राज ठाकरे यांना साकडे
- by Reporter
- Feb 22, 2021
- 587 views
मुलुंड:(शेखर भोसले)मुलुंडमधील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबियांना बळजबरीने घरे खाली करायला वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगत असल्याच्या तक्रारी या वसाहतीच्या महिलांनी व रहिवाशांनी मुलुंडच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे गेल्या आठवड्यात केल्या होत्या. त्याला अनुसरून मनसेचे महाराष्ट्र राज्य
उपाध्यक्ष सत्यवान दळवी व मुलुंड विधानसभा अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस वसाहतीतील गृहिणीनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली व बिल्डराच्या फायद्यासाठी पोलिस वसाहतीतील घरे बळजबरीने रिकामी करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली.
यावेळी राज ठाकरे यांनी महिलांच्या तक्रारी ऐकून घेत राहती घरे खाली न करण्याचा सल्ला दिला व सदर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मी बोलून घेतो असे आश्वासन दिले. मनसे नेते शिरीष सावंत, सचिव प्रसाद शेटे, मुलुंड उपविभाग अध्यक्ष राजेंद्र देशमुख, शंशाक माईनकर, संदिप कदम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाने गृहिणीना दिलासा मिळाला असल्याचे समजले.

रिपोर्टर